Crime News: सव्वादहा कोटींना गंडा घातल्याप्रकरणी पाच संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

आकाश अग्रवाल, नरेश अग्रवाल, मुरारीलाल अग्रवाल, राजेश अग्रवाल आणि अक्षय पंत अशी आरोपींची नावे आहेत | The accused have been identified as Akash Agarwal, Naresh Agarwal, Murarilal Agarwal, Rajesh Agarwal and Akshay Pant.
Crime News
Crime NewsSakal
Published on

Mumbai Crime : भागिदारीचे प्रलोभन देत एका विदेशी कंपनीला सुमारे सव्वादहा कोटींना गंडा घातल्याप्रकरणी खासगी कंपनीच्या पाच संचालकांविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

Crime News
Crime News: पतीला आला राग अन् गळा दाबून केली पत्नीची हत्या

आकाश अग्रवाल, नरेश अग्रवाल, मुरारीलाल अग्रवाल, राजेश अग्रवाल आणि अक्षय पंत अशी आरोपींची नावे आहेत. डेन्मार्क येथे कन्टेनर्स तयार करणारी एक नामांकित कंपनी असून याच कंपनीत तक्रारदार महिला संचालक म्हणून कामाला आहे. या कंपनीला भारतात त्यांचा व्यवसाय वाढवायचा होता. याचदरम्यान कंपनीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आरोपी आकाश अग्रवालशी ओळख झाली होती.(Andheri Crime News )

आकाशने त्यांना त्याची क्रिस्टल लॉजिस्टिक कुल चैन लिमिटेड नावाची कंपनी असून ही कंपनी कन्टेनर्स व्यवसायातील भारतातील नामांकित कंपनी असल्याचे भासवले. त्यामुळे त्यांनी त्याच्यासोबत भारतात नवीन कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान त्यांच्यात एक संयुक्त करार झाला होता.(Mumbai crime)

Crime News
Crime News: रेल्वे स्थानकावरील धक्कादायक प्रकार; आधी मोबाईल चोरला मग...

या करारानंतर या विदेशी कंपनीने आकाशच्या कंपनीला एक कोटी ८७ लाख रुपये गुंतवणुकीसाठी तसेच आठ कोटी ३३ लाख रुपयांचे ६२ कन्टेनर्स आणि ११ रॅम्प पाठविले होते. मात्र, विदेशातून पाठविलेल्या या कन्टेनर्स आणि रॅम्पची आकाशसह इतर संचालकांनी परस्पर विक्री करून कंपनीची फसवणूक केली. हा प्रकार नंतर या विदेशी कंपनीच्या निदर्शनास येताच तक्रारदार संचालक महिलेने वनराई पोलिसांत तक्रार केली.

Crime News
Nashik Crime News : दोघींचे मोबाईल नेले खेचून; स्नॅचर्सला आळा घालण्याचे पोलिसांसमोर आव्हान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com