vande bharat
vande bharat esakal

Konkan Railway News: मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनचा विस्ताराला विरोध

Vande Bharat Train: मुंबई- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला मंगळूरपर्यंत घेऊन जाण्याचे नियोजन रेल्वेचे आहे.

Vande Bharat Train : मंगळूर- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने या एक्स्प्रेसच्या एकत्रीकरणाचा विचार रेल्वे बोर्डाकडून सुरू आहे. मंगळूर- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस बंद करून त्याऐवजी मुंबई- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला मंगळूरपर्यंत घेऊन जाण्याचे नियोजन रेल्वेचे आहे. (kokan railway News)

मात्र, कोकण विकास समितीने याला जोरदार विरोध केला असून यासंदर्भात रेल्वे मंत्री ते कोकण रेल्वे प्रशासनाला निवेदन पाठविण्यात आले आहे.(kokan railway News)

सध्या ट्रेन क्रमांक २२२२९/३० वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते मडगावला ९८ ते १०० टक्के भारमानासह प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही एक्स्प्रेसही १६ डब्यांची करण्याची मागणी करण्यात येत आहे.

vande bharat
Railway : रेल्वेचा भोंगळ कारभार प्रवाशांच्या उठला जीवावर! ड्युटी संपली चालक घरी, मालगाडी फलाटावर तर प्रवाशी वा-यावर

मात्र, या एक्स्प्रेसचा विस्तार मंगळूरपर्यंत करण्याचे नियोजन रेल्वेचे आहे. त्यामुळे मुंबई- रत्नागिरी- सिंधुदुर्ग- गोवा विभागातील प्रवाशांना पुरेसा आरक्षण कोटा मिळणार नाही. कोकणातील प्रवाशांची गैरसोय होईल. मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये (वेळ आणि आरक्षण कोटा) बदल न करता ट्रेन क्रमांक २०६४५/४६ मंगळूर- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस एक वेगळी सेवा म्हणून मुंबईपर्यंत विस्तारित करण्यात यावी.

याशिवाय मंगळूर-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करून आणि सध्याच्या मुंबई- मडगाव वंदे भारत जेथे थांबत नाही, अशा स्थानकांवर थांबे देऊन मुंबई- गोवा आणि मुंबई- मंगळूर या दोन्ही मार्गांवरील प्रवाशांना स्वतंत्र सेवा देता येईल. त्यामुळे प्रवाशांना त्याच्या फायदा होईल, अशी माहिती कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी ‘सकाळ’ला दिली आहे.

vande bharat
Vande Bharat Express : नागपूर अन्‌ गोव्यासाठी सोलापूर विकास मंचने वंदे भारत एक्स्प्रेसची केली मागणी

वंदे भारतमध्ये स्लीपर कोच


मंगळूर- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस एक स्वतंत्र गाडी म्हणून मुंबईपर्यंत विस्तारित करण्यात यावी. एवढ्या लांबपल्ल्यासाठी बसण्याची निवास व्यवस्था सोईस्कर नसल्यामुळे मुंबई आणि मंगळूरदरम्यान अमृत भारत किंवा वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणे हा अधिक चांगला पर्याय आहे.

मुंबई- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस रद्द करून मुंबई- मंगळूर वंदे भारत चालवायची झाल्यास ही गाडी १६ डब्यांची चालवण्यात यावी, अशा सूचनाही कोकण विकास समिती रेल्वे मंत्र्यांकडे दिल्या आहेत.

vande bharat
Vande Bharat : 'वंदे भारत' आता अधिक सुरक्षित! आलं नवीन सेफ्टी फीचर; रेल्वेच्या ४५० एसी कोचमध्ये यंत्रणा कार्यान्वित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com