हुक्का पार्लर चालकासह दोघे ताब्यात

हुक्का पार्लर चालकासह दोघे ताब्यात

नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : नेरूळमधील सेंच्युरियन मॉलमध्ये बेकायदा सुरू असलेल्या ॲपल झाफरन कॅफे या रेस्टॉरंटवर नेरूळ पोलिसांनी छापा मारून हुक्का पार्लर चालक आणि वेटर अशा दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नीलेश शेवाळे व त्यांच्या पथकाने सोमवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास सेंच्युरियन मॉलमधील ॲपल झाफरन कॅफे या रेस्टॉरंटवर छापा मारला. या वेळी काही ग्राहक हुक्का ओढत बसल्याचे आढळून आले. अधिक तपासणीत त्या ठिकाणी ग्राहकांना हुक्क्यामध्ये निकोटीनयुक्त आणि तंबाखूयुक्त घटक असलेल्या सुगंधी पदार्थांचे सेवन करण्यासाठी देण्यात येत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हुक्का पार्लरचा चालक-मालक कमलदेवदास धरीदास (२६) व वेटर विकासकुमार गौतम (२६) यांच्यासह हुक्का ओढण्यासाठी बसलेल्या ग्राहकांविरोधात गुन्हा दाखल करून सर्वांना ताब्यात घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com