Thane Metro
Thane Metrosakal

Thane Metro: ठाणे मेट्रो धावणार; मुहूर्तही ठरला, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

ठाणे मेट्रोची प्रगती: वाहतुकीच्या आधुनिकीकरणाकडे एक पाऊल | Thane Metro will run; Know It's time, date & the latest updates...

Thane Metro: शहराला वाहतुकीचा उत्तम पर्याय ठरणाऱ्या आणि अनेक वर्षांपासून स्वप्नवत असलेल्या मेट्रो- ४ चे काम प्रगतिपथावर आहे. वडाळा ते कासारवडवली या मार्गिकेचे काम ६५ टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर २०२५ पर्यंत ते पूर्णत्वास येणार आहे. त्यामुळे २०२६ च्या नववर्षापासून ठाणेकरांचा मेट्रो प्रवास सुसाट होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मुंबईनंतर ठाण्यात विशेष करून घोडबंदर मार्गावर नागरीकरण वेगाने होत आहे.

या वेळी खासदार राजन विचारे यांनी पाहणी करून एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवास यांना हे काम तत्काळ सुरू करण्याची विनंती केली. त्यानंतर मेट्रो- ४ च्या कामाने वेग धरला.
सध्या सुरू असलेल्या मेट्रो कामाची खासदार राजन विचारे यांनी मंगळवारी सायंकाळी पुन्हा पाहणी करून आढावा घेतला. (Thane Metro News)

Thane Metro
Thane News : कर्मचाऱ्यांचा तुटवडा! अवघे १०० कर्मचारी हकतायत कळवा एसटी कार्यशाळेचा कारभार

ॉया भागात भविष्यात मेट्रो धावणार हे स्वप्न दाखवत अनेक गृहप्रकल्प उभे राहिले आणि मोठ्या संख्येने नागरिक राहायला आले; पण आजही या मार्गावरील रहिवाशांना मुंबई गाठण्यासाठी रस्ते मार्ग आणि त्यानंतर स्थानक गाठून पुढे लोकलने प्रवास करावा लागत आहे. सततच्या मागणीनंतर २०१६ मध्ये मेट्रो-४ ला मंजुरी मिळाली. यासाठी १४ हजार ५४९ कोटींच्या मंजूर निधीतून २०१८ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली; मात्र मध्यंतरी २०२२ मध्ये ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे चार महिने काम बंद झाले.(thane Metro)

Thane Metro
Thane News: ठाण्यात आता चार सदस्यांचाच प्रभाग!

विचारे यांनी कापूरबावडी जंक्शन, तत्त्वज्ञान विद्यापीठ, मानपाडा उड्डाणपूल, पातलीपाडा जंक्शन, सूरज वॉटर पार्क, कासारवडवली आणि भाईंदर पाडा अशा आणि इतर ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्या वेळी पालिकेचे अधिकारी, अभियंता, एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मेट्रोचे काम प्रगतिपथावर असून डिसेंबर २०२५ पर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे येत्या दीड वर्षात ठाण्यात प्रत्यक्ष मेट्रो धावण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे.(mumbai Metro News)

कामाची प्रगती
मेट्रो मार्ग क्रमांक ४ वडाळा ते कासारवडवली - ६५.३२ टक्के
पॅकेज क्रमांक ८ - भक्ती पार्क ते अमर महल
स्थानके - भक्ती पार्क मेट्रो, वडाळा टी. टी., आणिक नगर बस डेपो, सिद्धार्थ कॉलनी
कामाची स्थिती - ४६.५३ टक्के

- पॅकेज क्रमांक ९- गरोडिया नगर ते सूर्या नगर
स्थानके- गरोडिया नगर, पंतनगर, लक्ष्मी नगर, श्रेयस सिनेमा, गोदरेज कंपनी, विक्रोळी मेट्रो, सूर्यानगर
कामाची स्थिती - ८७.८१ टक्के

- पॅकेज क्रमांक १०- गांधीनगर ते सोनापूर
स्थानके- गांधीनगर, नवल हाऊसिंग, भांडुप महापालिका, भांडुप मेट्रो, शांग्रीला, सोनापूर
कामाची स्थिती - ५४ टक्के

पॅकेज क्रमांक ११- मुलुंड ते माजिवडा
स्थानके- मुलुंड फायर स्टेशन, मुलुंड नाका स्टेशन, तीन हात नाका, आरटीओ ठाणे, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजिवडा
कामाची स्थिती ९०.९८ टक्के

Thane Metro
Thane Politics: शिवसेनेचे दीपेश म्हात्रे यांच्या आमदारकीची चर्चा

पॅकेज क्रमांक १२- कापूरबावडी ते कासारवडवली
स्थानके- कापूरबावडी, मानपाडा, टिकुजीनी वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली
कामाची स्थिती - ५५.३८ टक्के(mumbai News)

मेट्रो मार्ग क्रमांक ४ ए - कासारवडवली ते गायमुख
भाग क्रमांक १- कासारवडवली ते गायमुख
स्थानके- गोवनी पाडा, गायमुख
कामाची स्थिती - ६७.३१ टक्के

मेट्रो मार्ग क्रमांक ५ कापूरबावडी ते भिवंडी
याचे काम प्रगतिपथावर सुरू असून ८४.१३ टक्के काम पूर्ण झाले आहे.


अंतर्गत मेट्रो, भाईंदर मेट्रो रखडली


मेट्रोला अंतर्गत मेट्रो जोडून हा प्रवास अधिक सुखकर करणाऱ्या प्रकल्पासाठी ठाणे महापालिकेने १० हजार ४१२.६१ कोटी इतक्या रकमेचा डीपीआर तयार केला आहे. हा डीपीआर केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडे सादर करण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे; परंतु अद्याप केंद्र शासनाने मंजुरी न दिल्याने अंतर्गत मेट्रो प्रकल्प रखडला आहे.(Maharshtra NEws)

तर दुसरीकडे दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो मार्ग क्र ९ आणि ठाणे मेट्रो ४ ए याला जोडण्यासाठी या मेट्रो मार्ग क्र १० गायमुख ते मिरा भाईंदर यालाही जोडण्यासाठी सर्वात पहिली मागणी करण्यात आली होती. या मेट्रो मार्गालाही राज्य सरकारने ६ सप्टेंबर २०१९ रोजी ४ हजार ४७६ कोटीची मंजुरी मिळालेली आहे. यामध्ये गायमुख रेतीबंदर, वर्सोवा चार फाटा, अमर महल, शिवाजी चौक काशीमिरा या ४ स्थानकांचा समावेश करण्यात आलेला आहे. अद्याप केंद्र शासनाची परवानगी मिळालेली नसल्याने तोही रखडला आहे.

Thane Metro
Thane News : ठाण्यात धडकणार 'भारत जोडो न्याय यात्रा'; राहुल गांधीच्या आगमनाने कॉंग्रेसला येणार सुगीचे दिवस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com