Thane Traffic News: आता ठाण्यातील ट्रॅफिकला बसणार आळा; माजिवाडा जंक्शनला लागणार शिस्त

Thane Traffic News: आता ठाण्यातील ट्रॅफिकला बसणार आळा; माजिवाडा जंक्शनला लागणार शिस्त

नाशिक- भिवंडीकडून घोडबंदर मार्गाकडे येणाऱ्या वाहनांना ‘वळण’ लागण्यास मदत होणार आहे |Godbandar Road Traffice Probem

Thane News: वाहनांच्या गर्दीत हरवलेल्या ठाण्यातील माजिवाडा जंक्शनला लवकरच शिस्त लागणार आहे. येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ठाणे महापालिका स्वयंचलीत सिग्नल यंत्रणा बसवणार आहे.

त्यामुळे गोल्डन डाईज सर्कल येथे घोडबंदर मार्गाकडून मुंबई व ठाणे रेल्वे स्थानकाकडे, मुंबईकडून घोडबंदरकडे व नाशिक- भिवंडीकडून घोडबंदर मार्गाकडे येणाऱ्या वाहनांना ‘वळण’ लागण्यास मदत होणार आहे.

घोडबंदरमार्गे मुंबई, ठाण्यात प्रवास करणाऱ्या वाहनांना माजिवाडा जंक्शनचे अग्निदिव्य पार केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. वास्तविक घोडबंदर रोड व नाशिक बायपासची सुरुवातच माजिवडा जंक्शन चौकातून होते.

नाशिक बायपासहून येणारी वाहने, लोढा रुस्तमजीच्या सर्व्हिस रोडकडे वळणारी वाहने तसेच जुना आग्रा रोड, घोडबंदर रोड आणि पूर्व द्रुतगती महामार्गाकडून येणारी वाहने या चौकात एकत्र येतात. यात हलकी वाहने, रिक्षा, दुचाकी आदींसोबत विविध परिवहन यंत्रणांच्या बस, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस, कंटेनर, ट्रक, टेम्पोला माजिवाडा जंक्शन पार केल्याशिवाय पुढे मार्गक्रमण करता येत नाही. म्हणून ठाण्यात तीन हात नाकानंतर सर्वाधिक वाहन गर्दीचे व कोंडीचे प्रवेशद्वार म्हणून माजिवाडा गणला जातो.

महत्त्वाचे जंक्शन असूनही येथे कोणत्याही प्रकारे लेनची शिस्त पाळली जात नाही. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी ऐन रहदारीच्या वेळेला नाशिक बायपास, घोडबंदर रोड आदींकडे जाणाऱ्या वाहनांना कोंडीचा सामना करावा लागतो. तर दुसरीकडे कापूरबावडी उड्डाणपुलाचा वापर करून ही कोंडी टाळण्याचा पर्यायही अवजड वाहनांना असतो. मात्र, तरीही जंक्शनला वळसा देऊन पुलाखालून जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे.

पादचाऱ्यांचे जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण


माजिवाडा जंक्शनच्या विचित्र कोंडीत वाहनचालक गोंधळून जातो. त्यामुळे गाडी चालवताना वाहनचालकाला समोरच नाही तर चौफेर लक्ष ठेवावे लागते. तर दुसरीकडे कोणती गाडी, कधी कुठून येईल, याचा नेम नसल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन हा चौक ओलांडावा लागतो. या वाहनांना वाट करून देण्यासाठी जंक्शनला लहानशी चौकी बसवली आहे; मात्र चहूबाजूने येणाऱ्या कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात अनेकदा वाहतूक पोलिसही असमर्थ ठरत असल्याने दिसून येते.

चालकांना योग्य दिशा मिळण्यास मदत


ठाणे शहरात सध्या तीन हात नाका, नितीन कंपनी, चरई चौक, खोपट, कॅडबरी जक्शन, आनंदनगर- घोडबंदर, कासारवडवली आदी ठिकाणी स्वयंचलीत सिग्नल यंत्रणा आहे. सिग्नलच्या वेळमर्यादेची सूचना देणाऱ्या या यंत्रणेमुळे वाहनचालकांना योग्य दिशा मिळण्यास मदत होत आहे; पण माजिवाडा जंक्शनसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी मात्र अशी व्यवस्था आतापर्यंत नव्हती. २४ तास वाहतूक पोलिसांची गरज असतानाही रात्री ११ नंतर हा मार्ग रामभरोसे असल्याचे चित्र होते.

ठाणे पालिकेचा पुढाकार


एखादी गाडी फसली की, कोंडी पूर्ण शहरभर पसरत असल्याचा अनुभव आहे. या सर्वांतून मार्ग काढण्यासाठी पालिकेने पुढाकार घेत येथे स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळच्या अर्थसंकल्पातही याचा समावेश केल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com