Holi News: पुरणपोळीला महागाईचा चटका ; गोडवा महागला

Holi News: पुरणपोळीला महागाईचा चटका ; गोडवा महागला

पुरणपोळी बनवण्याचे कामही अवघड आणि वेळखाऊ असते.

Dombivli: होळीचा सण काही दिवसांवर आला आहे. होळीच्या दिवशी महाराष्ट्रात आवर्जून पुरणपोळी हा गोड पदार्थ तयार केला जातो. पुरणपोळीचे नुसते नाव जरी काढले तरी सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र, यंदा जिन्नसांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने पुरणपोळी महाग झाली आहे.

Holi News: पुरणपोळीला महागाईचा चटका ; गोडवा महागला
Dombivli News : अखेर 14 गावांचा अंतिम निकाल लागला; 14 गावे नवी मुंबई महापालिकेत दाखल


महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीमध्ये पुरणपोळीला महत्त्वाचे स्थान आहे. अनेक सणांमध्ये पुरणपोळी ही केलीच जाते. त्यात होळीला आवर्जून असते. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू आणि इतर राज्यांमध्येही पुरणपोळी बनवतात. पण बाकीच्या राज्यांत ती वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. पुरणपोळी बनवण्याचे कामही अवघड आणि वेळखाऊ असते.

Holi News: पुरणपोळीला महागाईचा चटका ; गोडवा महागला
Dombivli News : तीन दिवसांसाठी सीएनजी पेट्रोल पंप बंद; ठराविक पंप चालू वाहनांच्या रांगाच रांगा

नोकरी करणाऱ्या महिलांना यासाठी निवांतपणा आणि पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करणे कठीण होऊन बसते. ही अडचण लक्षात घेऊन महिला बचत गटांनी पुरणपोळी बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

होळीनिमित्ताने घरगुती व विविध खाद्यपदार्थांच्या दुकानात, बचत गटांना ग्राहकवर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, मैदा किंवा गव्हाचे पीठ, गूळ, चण्याची डाळ, तूप आदी साहित्याच्या किमती दरवर्षीप्रमाणे यंदाही वाढल्या आहेत. त्यामुळे पुरणपोळीच्या किमतीतही काही प्रमाणात वाढ झाली आहे.

सध्याचे दर
गेल्या वर्षी १८ ते २० रुपयांना एक मिळणारी पुरणपोळी यंदा ३५ ते ४० रुपयांना मिळत आहे. विशेष म्हणजे, पुरणपोळ्यांचा आकार व वजनावर त्यांचे दर अवलंबून असतात. छोट्या आकाराच्या पुरणपोळ्या ३० रुपयांना, तर मोठ्या पुरणपोळ्या ३५ रुपयांना विकल्या जात आहेत.

Holi News: पुरणपोळीला महागाईचा चटका ; गोडवा महागला
Dombivli News : विविध समस्या, मागण्यांकडे वेधले पालिकेचे लक्ष; कल्याण मध्ये मनसेचा धडक मोर्चा

रेडिमेडला मागणीशहर परिसरात अनेक ठिकाणी गृहिणींनी मागणी केल्यास पुरणपोळ्या तयार करून दिल्या जातात. ग्रामीण भागामध्ये अजूनही पाट्यावर डाळ वाटून पुरण तयार करून पोळी बनवली जाते. मात्र, शहरी भागामध्ये नोकरदार महिला रेडिमेड पुरणपोळीला अधिक पसंती देतात. मागणीनुसार होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी घरपोच पुरणपोळी देण्याची सोय करण्यात येते.

Holi News: पुरणपोळीला महागाईचा चटका ; गोडवा महागला
Dombivli News : धक्कादायक! भूताटकीच्या संशयातून ज्येष्ठ नागरिकाला आगीच्या निखाऱ्यावर नाचविले

पुरणपोळी महाग झाली असली, तरी विक्रीवर कोणताही परिणाम होणार नाही. पुरणपोळीला नेहमीप्रमाणे या वर्षीही मागणी आहे.
- उज्‍ज्वला कामात, अध्यक्ष, महिला बचत गट

होळी सणानिमित्त पुरणपोळी खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. काही नागरिकांनी पुरणपोळीची आगाऊ नोंदणी केली आहे.
- गुलाब सिंग, विक्रेता

पुरणपोळीत कार्बोहायड्रेट्स, फायबर, बी-कॉम्प्लेक्स, जीवनसत्त्वे आणि काही खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. त्याचा फायदा तुमच्या शरीराला होतो. तसेच कणीक आणि डाळ एकत्र केल्याने तुम्हाला प्रथिने मिळतात. अमिनो अॅसिड मिळत असल्याने शरीरास अधिक फायदा होतो.
- अर्जुन काटे, आहारतज्‍ज्ञ

Holi News: पुरणपोळीला महागाईचा चटका ; गोडवा महागला
Dombivli : सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने काढली महिलेची छेडछाड ; डोंबिवलीतील आजदेपाडा येथील घटना, तरुणाला स्थानिकांनी दिला चोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com