bmc and highcourt
bmc and highcourt sakal

Mumbai News: वर्षभरात जमले नाही, ते आठवड्यात जमेल का? कोर्टाने मनपाला खडसावले

स्कायवॉकच्या रखडलेल्या कामावरून हायकोर्टाची पालिकेला फटकार | High Court reprimands municipality for stalled work of skywalk

Mumbai News: वांद्रे पूर्व येथील गेल्या अनेक महिन्यांपासून स्कायवॉकच्या रखडलेल्या कामावरून मुंबई उच्च न्यायालयाने आज पालिकेची चांगलीच खरडपट्टी काढली.

पूल बांधायला वर्षभरात जमले नाही, तर आठवडाभरात हे जमेल का, असा सवाल करून मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाने पालिकेला जाब विचारला इतकेच नव्हे तर याप्रकरणी तुमच्यावर अवमानाची कारवाई का करू नये, असे फटकारत पालिकेच्या ढिसाळ कारभारावर खंडपीठाने बोट ठेवले.(mumbai highcourt attacks bmc bandra news)

bmc and highcourt
Mumbai News : ‘एसएनडीटी’त अभिरूप संसद

वांद्रे पूर्व येथील रेल्वे स्थानक परिसरात स्कायवॉकअभावी लोकांची गैरसोय होत असून तेथील नागरिकांना नादुरुस्त फुटपाथवरून चालावे लागते. याप्रकरणी के.पी.पी. नायर यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज (ता. २०) मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

न्यायालयाने आदेश देऊन वर्ष उलटत आले, तरी पालिकेने अजून स्कायवॉकची साधी वीटही रचलेली नाही. पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.(mumbai highcourt news )

bmc and highcourt
Mumbai News : ‘एसएनडीटी’त अभिरूप संसद

याची दखल घेत खंडपीठाने पालिकेची बाजू मांडणाऱ्या ॲड. ऊर्जा धोंड यांना जाब विचारला, तसेच अधिकाऱ्यांना समन्स का बजावू नये, अवमानाची कारवाई का करू नये, अशी विचारणा केली. पालिकेला याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगत सुनावणी २७ मार्चला ठेवली.

फुटपाथचीही दुरवस्था


वांद्रे ते महामार्गापर्यंत असलेल्या फुटपाथचीही दयनीय अवस्था झाल्याचे याचिकाकर्त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. २०० मीटर लांब फुटपाथची दुर्दशा झाल्याने वृद्ध नागरिक, गर्भवतींना तेथून चालणे जिकिरीचे असल्याचे त्यांनी सांगितले. खंडपीठाने याची दखल घेत पालिकेला फटकारले, इतकेच नव्हे तर त्याकडे जातीने लक्ष देण्यास सांगितले.

bmc and highcourt
Mumbai Local News: लोकलमधील फुकट्यांवर 'बॅटमॅन'चा वॉच; आतापर्यंत तब्बल इतक्या हजार प्रवाशांवर केली कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com