Mumbai news mahrashtra
Mumbai news mahrashtra sakal

Mumbai News : भिवंडी मतदारसंघाबाबत काँग्रेस आग्रही; पदाधिकारी आक्रमक

Loksabha 2024: काँग्रेसतर्फे कुणीही उमेदवार दिला तरी त्याचे काम प्रामाणिकपणे करू | No matter who the candidate is given by Congress, we will do his job honestly
Published on

Murbad News: भिवंडी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेस पक्षाला देण्यात यावी, अशी मागणी मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. मुरबाड तालुक्याचे काँग्रेस अध्यक्ष चेतनसिंह पवार, तुकाराम ठाकरे, संध्या कदम, धनाजी बांगर, भगवान तारमळे यांनी पत्रकार परिषद घेत ही मागणी केली.

Mumbai news mahrashtra
Mumbai Crime: परीक्षेत प्रश्‍नांची उत्तरे न दाखवल्याने तीन विद्यार्थ्यांनी केला चाकूहल्ला

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत मुरबाड येथील जागा काँग्रेस पक्षाने लढवली होती. यात काँग्रेसच्या उमेदवाराला ३,६७,००० मते मिळाली होती. यंदाही काँग्रेसकडे कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे. या निवडणुकीतही काँग्रेसला मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून ही जागा काँग्रेसलाच मिळावी, असा दावा पदाधिकाऱ्यांनी केला.

दरम्यान, भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष निवडणूक लढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेसतर्फे कुणीही उमेदवार दिला तरी त्याचे काम प्रामाणिकपणे करू. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा गेल्यास वरिष्ठांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे चेतनसिंह पवार म्हणाले. ( )

Mumbai news mahrashtra
Navi Mumbai: दागिन्यांसह देशीबनावटीचे पिस्टल हस्तगत; पोलिसांची मोठी कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com