crime news navi mumbai
crime news navi mumbai Sakal

Crime News: पालिका कर्मचारी असल्याची बतावणी करत महिलेचा विनयभंग

या वेळी त्याने का २७ वर्षीय महिलेचा विनयभंगही केला. या व्यक्तीने आपला मोबाईल क्रमांकही दिला व नावही सांगितले |This time he also molested a 27-year-old woman. This person also gave his mobile number and name

Mira Bhaindar: मिरा-भाईंदर महापालिकेचा कर्मचारी असल्याची बतावणी करून पेणकरपाडा परिसरातील एका महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काशी-मिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेणकरपाडा परिसरात एक महिला खानावळीचा व्यवसाय करते. तिथे एक व्यक्ती मिरा-भाईंदर महापालिकेचा कर्मचारी असल्याचे सांगत आत घुसली. त्याने सर्व खानावळीची तपासणी करायची आहे, असे सांगत छायाचित्रे काढली. या वेळी त्याने एका २७ वर्षीय महिलेचा विनयभंगही केला. या व्यक्तीने आपला मोबाईल क्रमांकही दिला व नावही सांगितले.

crime news navi mumbai
Mira Bhayandar: जामीन मिळवून देण्यासाठी १० लाखांची मागणी; सहायक पोलिस निरीक्षकावर गुन्हा

याप्रकरणी पीडित महिलेने काशी-मिरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधला असता, तो महापालिकेतील खऱ्या कर्मचाऱ्याला लागला; मात्र तो निवडणूक कार्यात व्यग्र होता.(mumbai Crime)

हा कर्मचारी काशी-मिरा पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर विनयभंग करणारी व्यक्ती दुसरीच असल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. या गुन्ह्याचा अधिक तपास काशी-मिरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश पवार हे करत आहेत.(maharashtra crime)

crime news navi mumbai
Mira Bhayandar Crime: धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दोन तरुणांवर गुन्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com