ठाण्यात रंगणार ‘राज्ञी’ महिला महोत्सव

ठाण्यात रंगणार ‘राज्ञी’ महिला महोत्सव

ठाणे, ता. २८ (बातमीदार) : ठाण्यात राज्ञी वुमन वेल्फेअर असोसिएशनतर्फे ‘राज्ञी महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २९ ते ३१ मार्चदरम्यान होणार आहे. या तीन दिवसीय महोत्सवात महिलांसाठी विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. ‘ती’च्यातील कर्तृत्ववान ‘मी’चा सन्मानदेखील यावेळी केला जाणार आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी चार वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री नयना आपटे यांच्या हस्ते होणार आहे. या दिवशी लेखिका, कवयित्री डॉ. संगीता गोडबोले राज्ञी गीत प्रक्षेपित करणार आहे. पितांबरी प्रॉडक्टच्या प्रिया प्रभुदेसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात राज्ञी महिलांचा ‘विविधतेत एकता’ अशी थिम असलेला फॅशन शो रंगणार आहे. यावेळी कस्तुरी पोशाख या विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. कर्तृत्ववान ‘ती’ राज्ञी पुरस्काराने सुमेधा चिथडे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी लेखिका मेघना साने या ‘कोवळी उन्हे’ हा कविता आणि गाण्यांचा कार्यक्रम सादर करणार आहेत.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. ३०) रोजी सायंकाळी चार वाजता प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री आशा ज्ञाते आणि तन्वी हर्बलच्या डॉ. मानसी मेहेंदळे उपस्थित राहणार आहेत. यावेळी कर्तृत्ववान ‘ती’ राज्ञी पुरस्काराने विजया तायडे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच लोकनृत्य स्पर्धेचे सादरीकरण आणि लेखिका पद्मा हुशिंग यांचा ‘झाले मोकळे आकाश’ या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.

तिसऱ्या दिवशी रविवार (ता. ३१) सायंकाळी चार वाजता भारतीय कर्तृत्ववान महिला या थिमवर आधारित वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावेळी कर्तृत्ववान ‘ती’ राज्ञी पुरस्काराने जयश्री कुलकर्णी, वंदना प्रसादे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच लेखिका वृंदा दाभोळकर यांचा ‘कथाकथना’चा विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या समारोपासाठी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देशमुख उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम तीन दिवस सायंकाळी चार ते रात्री साडेसात वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com