क्लीन अप मार्शलच्या निविदेत गैरव्यवहार

क्लीन अप मार्शलच्या निविदेत गैरव्यवहार

अंधेरी, ता. २८ (बातमीदार) : मुंबई महापालिकेच्या क्लीनअप मार्शल निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाला असून आहे. यात २०२० साली क्लीनअप मार्शल प्रक्रियेत समावेश असलेल्या ५४ कंपन्याच्या निविदा रद्द करून त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र, याच कंपन्यांना २०२४ या वर्षात पात्र ठरल्या. त्यात गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते फुलचंद उबाळे यांनी केली आहे.
क्लीनअप मार्शल निविदाबाबत मुंबई पालिकेच्या प्रशासनाने चुकीची दिली जात असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते उबाळे यांचे म्हणणे आहे. यात निविदा मंजूर करणे, पात्र कंपनीकडून पाच लाख सुरक्षा अनामत रक्कम रीतसर घेतली जाते. मात्र, निविदा मंजूर झालेल्या कंपनीकडून कुठल्या नियमांच्या आधारे अनामत सुरक्षा रक्कम घेण्यात आली, असा सवालही त्यांनी केला आहे. पात्र कंपन्यांनी कोट्यवधीचा दाखविलेला लेखाजोखा खरा आहे काय किंवा याबाबत प्रशासनाने आयकर विभागाकडे चौकशी केलेली आहे काय, असा प्रश्न त्यांनी केला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया रद्द करून ती राबवण्यात यावी आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी उबाळे यांनी केली आहे.
----------------
निर्णय वरिष्ठ पातळीवरून
क्लीनअप मार्शल टेंडर प्रक्रियेत त्यांनी अपिलात जावे. याबाबत प्रशासनाने निर्णय घेतला आहे. पात्र कुठले आणि अपात्र कुठले हे ठरवून झालेला निर्णय आहे. आम्ही कुठलेही पेपर चुकीचे दिलेले नाहीत, ते खरे आहे. या गोष्टीचा विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. वरिष्ठ पातळीवर घेऊन निर्णय घेतलेला आहे. आम्ही टेंडर काढलेले नाही. तेच टेंडर पाच लाखांचे आहे, असे सी विभागाचे सहायक आयुक्त उद्धव चंदनशिवे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com