Railway News
Railway Newssakal

Railway News: प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा; रेल्वेच्या त्या विशेष गाड्यांना मुदतवाढ

पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल-भुसावळ स्पेशल आणि इंदूर-पुणे साप्ताहिक स्पेशल गाड्यांना मुदतवाढ दिली आहे | Western Railway has extended Mumbai Central-Bhusawal Special and Indore-Pune Weekly Special trains

मुंबई, ता. २८ : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल-भुसावळ स्पेशल आणि इंदूर-पुणे साप्ताहिक स्पेशल गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ट्रेन क्रमांक ०९०५१ मुंबई सेंट्रल-भुसावळ स्पेशल या गाडी पूर्वी ३० एप्रिलपर्यंत सुरू ठेवण्यात येणार होती. आता ही गाडी ३० जूनपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.

तसेच ट्रेन क्रमांक ०९०५२ भुसावळ-मुंबई सेंट्रल स्पेशल गाडी आता १ मेऐवजी १ जुलैपर्यंत सुरू असणार आहे. तसेच ट्रेन क्रमांक ०९३२४ इंदूर-पुणे साप्ताहिक स्पेशल गाडी आता २४ एप्रिलऐवजी २६ जूनपर्यंत सुरू राहणार आहे; तर ट्रेन क्रमांक ०९३२३ पुणे-इंदूर साप्ताहिक स्पेशल गाडी २५ एप्रिलऐवजी २७ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. मुदत वाढवण्यात आलेल्या विशेष गाड्यांचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळांवर ३१ मार्चपासून सुरू होणार आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com