Railway News: सुट्टीवर जाण्याचा विचार करताय? तर नक्की वाचा कामाची बातमी

१५६ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या गाड्यांचे आरक्षण शनिवार (ता. ३०) पासून सुरू आहे|
Railway News
Railway Newssakal

Mumbai News: उन्हाळी सुटीच्या कालावधीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबई-बनारस / दानापूर / समस्तीपूर, प्रयागराज / गोरखपूर दरम्यान १५६ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या गाड्यांचे आरक्षण शनिवार (ता. ३०) पासून सुरू आहे.( 156 summer special trains have been announced)


मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर साप्ताहिक विशेष २६ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज सुपरफास्ट एसी साप्ताहिक विशेष २६ फेऱ्या आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर साप्ताहिक विशेष २६ फेऱ्या अशा १५६ उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. यासाठीचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

Railway News
Mumbai News: पोलिसांची मोठी कारवाई; चार दिवसांत ३८२ मद्यपींवर कारवाई

विशेष ट्रेनचे वेळापत्रक
- लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ३ एप्रिल ते २६ जूनदरम्यान दर बुधवारी रात्री १२.१५ वाजता सुटणाऱ्या एलटीटी-बनारस साप्ताहिक विशेष ट्रेन क्रमांक ०१०५३ दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.०५ वाजता बनारस येथे पोहोचणार आहे. (lokmanya tilak nagar)
- बनारस येथून ४ एप्रिल ते २७ जून दरम्यान दर गुरुवारी रात्री ८.३० वाजता सुटणारी ट्रेन क्रमांक ०१०५४ साप्ताहिक विशेष ट्रेन दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे.

Railway News
Mumbai Local: गुड फ्रायडेला लोकल घावल्या रविवारच्या वेळापत्राने; प्रवाशांची तारांबळ

- लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १ एप्रिल ते २९ जूनदरम्यान दर सोमवार आणि शनिवारी मध्यरात्री १२.१५ वाजता सुटणारी ट्रेन क्रमांक ०१४१० द्वि-साप्ताहिक विशेष दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजता दानापूर येथे पोहोचेल.
- दानापूर येथून २ एप्रिल ते ३० जूनदरम्यान दर मंगळवार आणि रविवारी संध्याकाळी ६.१५ वाजता सुटणारी ट्रेन क्रमांक ०१४१० द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे.

Railway News
Mumbai News: मुंबईकरांनो लक्ष द्या; हा महत्वाचा रस्ता राहणार दोन महिने बंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com