Thane News: वसुलीच झाली नाही तर कशी देणार कंत्राटदारांची बिलं? ठाणे पालिकेच्या तिजोरीत खणखणाट

Thane News: वसुलीच झाली नाही तर कशी देणार कंत्राटदारांची बिलं? ठाणे पालिकेच्या तिजोरीत खणखणाट

निवडणुकीच्या कामाला अधिकारी कर्मचाऱ्यांना जुंपल्याने त्याचा परिणाम वसुलीवर झाला आहे. सध्या पालिकेच्या तिजोरीत केवळ १० कोटीच शिल्लक आहेत| Due to the involvement of officers and employees in election work, it has affected the collection. At present only 10 crores are left in the coffers of the municipality

Thane News: पालिकेचा आर्थिक गाडा रुळावर येण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत. ठाणे पालिकेने मार्च २०२२ पर्यंतची कंत्राटदारांची ८६ कोटींची बिले अदा करण्याचे लक्ष्य ठेवले होते.

मात्र, निवडणुकीच्या कामाला अधिकारी कर्मचाऱ्यांना जुंपल्याने त्याचा परिणाम वसुलीवर झाला आहे. सध्या पालिकेच्या तिजोरीत केवळ १० कोटीच शिल्लक आहेत.

त्यामुळे कंत्राटदारांची शिल्लक असलेली १७ कोटींची बिले कशी द्यायची, असा पेच पालिकेपुढे उभा राहिला आहे.

Thane News: वसुलीच झाली नाही तर कशी देणार कंत्राटदारांची बिलं? ठाणे पालिकेच्या तिजोरीत खणखणाट
Thane News: ठाण्याचा पारा ४० पार; जिल्ह्याची डेंजर झोनकडे वाटचाल

कोरोनापासून ठाणे पालिकेची आर्थिक परिस्थिती तोळामासा झाली आहे. पालिका कर्मचाऱ्यांचा महिन्याचा पगार निघेल की नाही, अशी स्थिती असताना लोकसभा निवडणुकीच्या कामांना पालिका अधिकारी आणि कर्मचारी जुंपले गेल्याने पाणीपट्टी, मालमत्ता कर वसुलीवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे तिजोरीत खडखडाट असल्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवताना नाकीनऊ येत आहे.

Thane News: वसुलीच झाली नाही तर कशी देणार कंत्राटदारांची बिलं? ठाणे पालिकेच्या तिजोरीत खणखणाट
Thane News: भिवंडीत ऐन रमजान महिन्यात पाणीटंचाई

पालिकेवर एक हजार २०० कोटींचे दायित्व आहे. मार्च २०२२ अखेरपर्यंतची ठेकेदारांची ८६ कोटींची बिले अदा करण्यासाठी यादी तयार केली होती. त्यानुसार २० मार्चपर्यंत पालिकेने ५५ ते ६५ कोटींच्या आसपास बिले अदा केली आहेत.

मात्र उर्वरित १७ कोटींची बिले अदा कशी करायची, असा पेच उभा राहिला आहे. दोन दिवसांपूर्वी २२ कोटी असलेल्या तिजोरीत गुरुवारी १० कोटीच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे कंत्राटदारांची उर्वरित बिले कशी अदा करायची, असा पेच निर्माण झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

Thane News: वसुलीच झाली नाही तर कशी देणार कंत्राटदारांची बिलं? ठाणे पालिकेच्या तिजोरीत खणखणाट
Thane News : ठाणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो? शरद पवार पक्षाने काढले परांजपे-मुल्लांचे वाभाडे

वेतनासाठीही निधी अपुरा?


ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगारापोटी यापूर्वी ७५ ते ८० कोटींच्या आसपास खर्च येत होता. आता सातवा वेतन आयोग लागू झाल्याने त्यासाठी महिन्याला ११७ कोटी आवश्यक असतात. हा खर्च शासनाकडून येणाऱ्या जीएसटीच्या अनुदानातून भागवला जातो.

येणारा निधी हा पगाराच्या निधीपेक्षा कमी येत आहे. त्यातही आता पालिकेच्या तिजोरीत पगारासाठी १११ कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित सहा कोटींची तरतूद पालिकेला इतर स्त्रोतांतून करावी लागणार आहे.

Thane News: वसुलीच झाली नाही तर कशी देणार कंत्राटदारांची बिलं? ठाणे पालिकेच्या तिजोरीत खणखणाट
Thane Politics: आनंद परांजपे आणि नजीब मुल्लांना महायुतीत महत्व नाही; शरद पवार गटाच्या नेत्याची टिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com