CM शिंदेंना धक्का! राज्यातल्या 'या' पाच जागा मित्र पक्षांना देण्यास भाजपचा नकार?

CM शिंदेंना धक्का! राज्यातल्या 'या' पाच जागा मित्र पक्षांना देण्यास भाजपचा नकार?

रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जागांचा आग्रह धरला | Chief Minister Eknath Shinde insisted on these seats during the meeting which lasted till late night

Mumbai News: चार वर्षे भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन तयार केलेले लोकसभा मतदारसंघ मित्रपक्ष जिंकू शकणार नाहीत.

तेथे मते हस्तांतरित होणे सोपे नाही, असे कारण देत रत्नागिरी, पालघर, ठाणे, सातारा आणि नाशिक हे मतदारसंघ सोडण्यास भाजपने ठाम नकार दिला असल्याचे समजते. (It is understood that the BJP has firmly refused to leave Ratnagiri, Palghar, Thane, Satara and Nashik constituencies.)

रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जागांचा आग्रह धरला तर महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित यश मिळणार नाही, असे भाजप नेत्यांनी उघडपणे सांगितल्याचे समजते. त्यामुळे हा वाद आता दिल्ली दरबारी चर्चेला येण्याची शक्यता आहे.

CM शिंदेंना धक्का! राज्यातल्या 'या' पाच जागा मित्र पक्षांना देण्यास भाजपचा नकार?
Eknath Shinde: मुख्यमंत्री अज्ञातस्थळी! भेटीसाठी आलेले आमदार निवासस्थानी राहिले ताटकळत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल १५ जागांचा आग्रह धरून काही वेळ संपर्क तोडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत बैठक चालली. शिवसेनेने घोषित केलेल्या आठ जागांवर कोणत्या खासदाराला ‘अॅंटी इन्कम्बन्सी’चा सामना करावा लागतो आहे हे त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिंदे-फडणवीस यांच्यात झालेल्या या बैठकीला जागावाटपाची शिखर परिषद असे म्हटले जात आहे.(The meeting between Shinde and Fadnavis is being called as seat sharing summit.)

भाजप आणि शिवसेनेच्या या वेळी उपस्थित असलेल्या मंत्र्यांनी आपापली बाजू भक्कमपणे लावून धरली होती. मराठवाड्यातील हिंगोली, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, हातकणंगले या जागांवर नाराजीचा सामना करावा लागणार आहे, असे या वेळी लक्षात आणून देण्यात आले.(Hingoli, Kolhapur in West Maharashtra, Hatkanangle will have to face resentment)

रामटेक लोकसभा मतदारसंघ हा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षेत्रात येतो, तरीही मुख्यमंत्री शिंदे यांचा मान राखण्यासाठी राजू पारवे यांना ते भाजपकडून लढण्यास इच्छुक असताना शिवसेनेकडे पाठवण्यात आले.(Raju Parve was sent to Shiv Sena when he was willing to contest from BJP to maintain the honor of Chief Minister Shinde.)

CM शिंदेंना धक्का! राज्यातल्या 'या' पाच जागा मित्र पक्षांना देण्यास भाजपचा नकार?
Eknath Shinde Candidate List : कोल्हापुरातून पुन्हा मंडलिक, बुलडाण्यात संजय गायकवाडांनी अर्ज भरला, पण तिकीट जाधवांना; शिवसेनेचे ८ उमेदवार जाहीर

आता सातारा, पालघर या दोन मतदारसंघांतील जिंकू शकणारे चेहरे सेनेची उमेदवारी घ्यायला तयार नाहीत हे समजून घ्यावे, असेही विनवण्यात आल्याचे समजते. कोपरी पाचपाखाडी हा विधानसभा मतदारसंघ मुख्यमंत्री शिंदे यांचा आहे, तो ज्या ठाणे लोकसभा मतदारसंघात येतो तो आम्हाला द्या, असा शिवसेनेचा आग्रह आहे.

मात्र, पालकमंत्री असलेल्या क्षेत्रातील रामटेकसाठी १०५ आमदार असलेले फडणवीस समजूतदारपणे वागतात तर शिंदे यांनीही वस्तुस्थिती लक्षात घेण्यात हरकत ती काय, असे विधान भाजपच्या एका मंत्र्याने या बैठकीत केल्याची गरमागरम चर्चा आज सुरू होती.

CM शिंदेंना धक्का! राज्यातल्या 'या' पाच जागा मित्र पक्षांना देण्यास भाजपचा नकार?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली! विद्यमान खासदाराला डावलून आमदाराने दाखल केला उमेदवारी अर्ज

राणे, भुजबळांसाठी आग्रही


सिंधुदुर्ग-रत्नागिरीत नारायण राणे हे किरण सामंत यांच्यापेक्षा सरस उमेदवार आहेत, असेही या वेळी सांगण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भातील आकडेवारी समजून घेतली आहे. किरण सामंत त्यांचे भाऊ आहेत.(Narayan Rane is a better candidate than Kiran Samant in Sindhudurg-Ratnagiri)

नाशिकमध्ये शिंदे गटाकडे असलेले खासदार हेमंत गोडसे जिंकू शकत नाहीत, अशी माहिती भाजपने दिली. या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.(Chhagan Bhujbal's name is likely to be fixed in nasik.)

या प्रस्तावाला शिंदे गटाने माळी उमेदवार असेल तर मराठा मते मिळणार नाहीत, असे कारण देत विरोध करताच भाजपने १२ मराठा उमेदवार दिले आहेत, त्यामुळे चिंता नको, असे सांगितल्याचेही समजते.(BJP has given 12 Maratha candidates as opposed)

CM शिंदेंना धक्का! राज्यातल्या 'या' पाच जागा मित्र पक्षांना देण्यास भाजपचा नकार?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली! विद्यमान खासदाराला डावलून आमदाराने दाखल केला उमेदवारी अर्ज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com