bmc news
bmc newssakal

Mumbai News: मुंबईकरांनो पालिकेच्या विकासकामांना सहा महिने लागणार ब्रेक; हे आहे कारण

पालिकेच्या नव्या आणि सुरू असलेल्या विकासकामांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे |The new and ongoing development works of the municipality are likely to get a break


Mumbai News: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रियेपाठोपाठ पावसाळा सुरू होईल. त्यामुळे पालिकेच्या नव्या आणि सुरू असलेल्या विकासकामांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.


निवडणूक आचारसंहितेचा फटका विविध प्रकल्पांना बसत आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोड या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील गोरेगाव पूर्व येथील रत्नागिरी हॉटेल येथील उड्डाण आणि विस्तारित कामे रेंगाळण्याची शक्यता आहे.

bmc news
Mumbai Temperature: मुंबईकरांना उन्हाच्या झळा; तीव्रता वाढली

या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. माटुंगा रेल्वेस्थानक आणि मुंबादेवी येथील बहुस्तरीय यांत्रिकी पार्किंग, तसेच रोबो पार्किंग या ठिकाणी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिकेचे पार्क आणि क्रीडांगणे येथेही अंडरग्राऊंड पार्किंगची सुविधा करण्यात येणार आहे. मात्र, ही कामेही रखडण्याची शक्यता आहे.

bmc news
Mumbai Local News : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवर ६ दिवस असणार रात्रकालीन ब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक

‘या’ कामांना फटका


पश्चिम द्रुतगती मार्गाशेजारी पुलाचे काम, मृणालताई गोरे उड्डाणपुलाचे विस्तारित काम, माहीम कॉजवे येथील मिठी नदीवरील पुलाचे रुंदीकरण आणि पुनर्बांधणीचे काम, विक्रोळी रेल्वेस्थानकाचे उड्डाणपुलाचे काम ही कामे अर्धवट असून या कामांचाही खोळंबा होण्याची शक्यता आहे.

bmc news
Mumbai Local News : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवर ६ दिवस असणार रात्रकालीन ब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com