Thane Politics
Thane Politicssakal

Thane Politics: तुम्हीच तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला; केसरकरांची ठाकरेंवर टिका

ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात शुक्रवारी आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता meeting was organized on behalf of MLA Pratap Sarnaik at Kashinath Ghanekar Theater on Friday.

Thane News: ‘‘खरे शिवसैनिक कोण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. शिवसेना ही मराठी माणसाचा अभिमान आहे, उगाच सांगता आमचा पक्ष चोरला अमुक केले तमुक केले.

उलट तुम्हीच तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला,’’ अशी खोचक टीका शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटावर शुक्रवारी महायुतीच्या मेळाव्यात केली.

ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात शुक्रवारी आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मार्गदर्शन केले.

Thane Politics
Maharashtra Politics: रात्रीस बैठका चाले! वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत तीन नेत्यांमध्ये खलबतं; CM शिंदे आज करणार मोठी घोषणा?

‘‘मुंबईचा पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला जर्मनीला पाठवले. तेथे सरकारसोबत वाटाघाटी केल्यावर त्यांचे मंत्रिमंडळ महाराष्ट्र आले होते. त्यावेळी आम्ही एक करार केला. त्यामध्ये एका वर्षात चार लाख मुलांना जर्मनीला पाठवण्याचा हा करार केला आहे.

ज्यांना भारतात ३५ हजार पगार मिळतो, त्यांना जर्मनीत साडेतीन लाख रुपये पगार मिळेल. तसेच जर्मनी सरकारने त्या ठिकाणी महाराष्ट्रासाठी सहा केंद्र तयार केली आहेत,’’ असे सांगत केसरकर यांनी, ‘‘याला महाराष्ट्राचे सरकार आणि महाराष्ट्र म्हणतात,’’ असे उद्गार काढले.

तसेच ‘‘महाराष्ट्राचा अभिमान आम्हाला आहे, म्हणून आम्ही दिवस- रात्र काम करतोय, गद्दार म्हणून ऐकायला काम करत नाही,’’ असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. ‘‘खोके खोके म्हणायचे हे कोणीही सहन करणार नाही. आमची तीन-तीन पिढ्यांची श्रीमंती आहे.

आम्हाला कोणाच्या पैशांची गरज नाही,’’ असा टोला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नाव न घेता ठाकरे पिता-पुत्रांवर लगावला.

..

Thane Politics
Eknath Shinde : ''आता त्याग पुरे झाला, मित्रपक्षांना आणखी जागा सोडू नका..'', मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पदाधिकारी आक्रमक

उमेदवाराबाबत सूचक वक्तव्य


ठाण्याचा उमेदवार कोण असेल, याबाबत सूचक विधान करत केसरकर यांनी या मेळाव्याच्या व्यासपीठावर बसलेल्या इच्छुकांपैकी एक जण उमेदवार आहे आणि तो भरघोस मतांनी निवडून येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनेचे रवींद्र फाटक, नरेश म्हस्के, भाजपचे संजीव नाईक या इच्छुकांसह शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, भाजप आमदार संजय केळकर आणि राष्ट्रवादी प्रवक्ते आनंद परांजपे हे उपस्थित होते. त्यामुळे यापैकी एक जण उमेदवार असणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

Thane Politics
Shrikant Shinde on Ganpat Gaikwad: उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंचा गणपत गायकवाडांवर हल्लाबोल; म्हणाले, गुंड प्रवृत्ती...

मोदींना भेटलो असतो तर नाही म्हणून सांगू शकलो नसतो - केसरकर


‘‘बाळासाहेबांच्या विचारासाठी मी जेव्हा कोकणात लढा दिला, तेव्हा मला पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीत बोलविले होते. त्यावेळीसुद्धा मी तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना समजावून सांगितले.

तसेच मी जर मोदींना भेटलो असतो, तर नाही म्हणून सांगू शकलो नसतो,’’ असेही उद्गार राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी रात्री झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात बोलताना काढले. यावरून त्यांनाही भाजपने ऑफर केल्याचे त्यावेळी बोलण्याच्या ओघात सांगितले.

Thane Politics
Shrikant Shinde: कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंना उमेदवारी मिळणार की नाही? फडणवीसांनी अखेर स्पष्टच सांगितलं


ठाणे जिल्हा आघाडीवर असायला हवा


‘‘पंतप्रधान मोदींनी ‘अब की बार ४०० पार’ असे म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यातून ४८ पैकी ४५ खासदार निवडून आणू, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शब्द दिला आहे. यामुळे आपण राज्यातून ४५ खासदार निवडून द्यायला हवेत आणि त्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाणे जिल्हा आघाडीवर असायला हवा,’’ असे केसरकर म्हणाले.

‘‘आपल्याकडे इच्छुक उमेदवार खूपच आहेत; पण सगळ्यांचे म्हणणे एकच आहे की, पंतप्रधान मोदी यांना ताकद द्यायची आणि त्याच्यासाठीच ही लढाई आहे. ही लढाई तुम्ही- आम्ही मिळून जिंकून दाखवू,’’ असेही केसरकर यांनी सांगितले.

Thane Politics
Ekanth Shinde: विद्यमान खासदारांना नकार मुख्यमंत्र्यांना पडणार महागात?; वाचा कसा होणार शिंदेंना तोटा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com