Water News: मुंबईपासून अगदी जवळच असतांना या गावी आठ दिवसांतून एकदाच पाणी; नागरिक मेटाकुटीला

Water News: मुंबईपासून अगदी जवळच असतांना या गावी आठ दिवसांतून एकदाच पाणी; नागरिक मेटाकुटीला

आठ दिवसांतून एकदाच पाणी येत असल्याने पाण्याचे नियोजन कसे करावे यातच गावातील नागरिकांचा वेळ जात आहे |As the water comes only once in eight days, the villagers are spending their time in how to plan the water supply

Uran News: उरण तालुक्यातील गोवठणे गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य असून यामुळे गोवठणे गावातील नागरिक मेटाकुटीला आले आहेत.

अनेक वेळा निवेदने, पत्रे देऊनही गोवठणे गावातील पाणीप्रश्‍न सुटत नसल्याने ग्रामस्थांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आठ दिवसांतून एकदाच पाणी येत असल्याने पाण्याचे नियोजन कसे करावे यातच गावातील नागरिकांचा वेळ जात आहे.

Water News: मुंबईपासून अगदी जवळच असतांना या गावी आठ दिवसांतून एकदाच पाणी; नागरिक मेटाकुटीला
Uran News: न्याय हक्कांसाठी उरणमध्ये शेतकऱ्यांची आक्रमक; हिंद टर्मिनलवर दिली धडक


मुंबई शहरापासून हाकेच्या अंतरावर उरण तालुका आहे; मात्र अजूनही उरणपासून जवळपास असणाऱ्या गोवठणे गावातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे आठ दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने येथील ग्रामस्थांचे पाण्याविना हाल होत आहेत. गोवठणे गावाला पुनाडे धरणातून पाणीपुरवठा होत आहे. लघुपाटबंधारे खात्याच्या ताब्यात हे धरण आहे.

पुनाडे गावाच्या हद्दीतील डोंगररांगात उभारलेल्‍या पुनाडे धरणाचा पसारा मोठा आहे; मात्र ठराविक उंचीवर या धरणात पाणीगळती होते. त्यामुळे कितीही मुबलक पाऊस झाला तरी या गळतीमुळे पाण्याची पातळी लवकर घसरत आहे. आठ दिवसांतून येणाऱ्या पाण्यामुळे पाण्याचे नियोजन कसे करावे हा प्रश्‍न गोवठणे ग्रामस्थांपुढे उभा आहे. त्यामुळे पाणी येण्याच्या दिवशी बाहेर कितीही महत्त्वाचे काम असेल तर ते काम टाळण्याची वेळ निव्वळ पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांवर येत आहे.

Water News: मुंबईपासून अगदी जवळच असतांना या गावी आठ दिवसांतून एकदाच पाणी; नागरिक मेटाकुटीला
Uran News: करंजा गावामध्ये पंधरा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा; नागरिक हैराण

शेवटी पाणी संपल्यास ते विकत घेण्याची वेळ येत आहे. त्याचप्रमाणे बांधकामासाठी किंवा इतर काही शुभकार्य असल्यास ग्रामस्थ टँकर मागवत आहेत. गोवठणे ग्रामस्थांच्या पाण्याच्या प्रश्‍नाकडे आठगाव पाणी कमिटी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील ग्रामस्थ करीत आहेत. या संदर्भात आठगाव पाणी कमिटीच्या अध्यक्ष अनामिका म्हात्रे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.


आमच्या गावात आठ दिवसांतून एकदाच पाणी येते. त्यामुळे पाण्याचे नियोजन कसे करावे हा प्रश्‍न आमच्यापुढे उभा असतो. पाणी येण्याचा दिवस असेल त्या दिवशी कितीही महत्त्वाचे काम असेल तर ते काम आम्हाला टाळावे लागते व तो दिवस पाणी भरण्यासाठीच आम्हाला द्यावा लागतो.


- मंजुळा म्हात्रे, ग्रामस्थ गोठवणे


सद्यस्थितीत धरणात पाण्याची साठा कमी असल्यामुळे पाण्याचा दाबदेखील कमी आहे. त्याचप्रमाणे गावातील पाण्यासंबंधीचा निर्णय संपूर्ण आठगाव पाणी कमिटीच्या माध्यमातून घेण्यात येतो.


- वाय. एस. पाटील, ग्रामसेवक

Water News: मुंबईपासून अगदी जवळच असतांना या गावी आठ दिवसांतून एकदाच पाणी; नागरिक मेटाकुटीला
Uran News: विकासात्मक बदलांमुळे उरण परिसरातील कौलारू घरे नामशेष होण्याच्या मार्गावर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com