नवी मुंबईत १३८ शाळांची आरटीईअंतर्गत नोंदणी

नवी मुंबईत १३८ शाळांची आरटीईअंतर्गत नोंदणी

तुर्भे, ता. १७ (बातमीदार) : शिक्षण हक्क अधिनियमानुसार (आरटीई) २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. नवी मुंबईत १३८ शाळांची आरटीईअंतर्गत नोंदणी आहेत. संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये २ हजार ६०० हून अधिक शाळांमधून ४३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश उपलब्ध होणार आहे. यामध्ये पहिली किंवा नर्सरीच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे.
आरटीईअंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांनी अर्ज भरावे, असे आवाहन शिक्षण विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात १६ ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुभा असणार आहे. यंदाच्या वर्षी आरटीईची प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू झाल्यामुळे पालकांमध्ये नाराजी आहे. तसेच खाजगी शाळांची प्रवेश प्रक्रिया डिसेंबर जानेवारीपासूनच सुरू झाली होती. आरटीईची प्रवेश प्रक्रिया कधी चालू होते याकडे गेल्या अनेक दिवसांपासून पालक डोळे लावून बसले होते; या प्रक्रियेला विलंब होत असल्याचे लक्षात आल्याने अनेक पालकांना नाईलाजाने आर्थिक परिस्थिती नसतानाही खाशगी शाळांमध्ये मुलांचे प्रवेश घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक पालकांनी त्यांच्या राहत्या घराजवळील खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेतले आहेत.

----------
निकष बदलल्याचा फटका
आरटीईद्वारे प्रवेशाचे निकष यावर्षी बदलले आहेत. याचा फटकादेखील गोरगरीब विद्यार्थ्यांना बसणार आहे. प्रवेश अर्ज भरताना घराच्या जवळील शासकीय तसेच अनुदानित शाळा प्राधान्याने संबंधित पालकांना निवडावी लागणार आहे. जर या शाळा नसतील तरच त्यांना घराजवळील अन्य खासगी शाळेचा पर्याय उपलब्ध असणार आहे. त्यामुळे घराजवळ नामांकित खाजगी शाळा असूनही पालकांना या शाळेमध्ये त्यांच्या मुलांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com