Mumbai News: तब्बल इतक्या कोटींचा ‘जीएसटी’ घोटाळा झाला उघड; दोन संचालकांना अटक

Mumbai News: तब्बल इतक्या कोटींचा ‘जीएसटी’ घोटाळा झाला उघड; दोन संचालकांना अटक

Mumbai News: महाराष्ट्र सरकारच्या वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरी प्रकरणात सहा कोटी ४० लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला आहे.

बोगस बिलांसंदर्भात जीएसटी विभागाकडून सुरू असलेल्या धडक मोहिमेंतर्गत कमलेश बाबूलाल जैन (वय ६१) आणि भावना कमलेश जैन (वय ६१) या दोन संचालकांना मंगळवारी अटक करण्यात आली, अशी माहिती राज्य कर उपायुक्त राजेंद्र टिळेकर यांनी दिली.

मोनोपोली इनोव्हेशन्स प्रा. लि. या कंपनीविरोधात वस्तू व सेवाकर विभागाकडून अन्वेषण कारवाई सुरू करण्यात आली होती. कारवाईदरम्यान या व्यापाऱ्याने नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी व विक्री दाखवून ६.४० कोटी रुपयांची महसूल हानी केली आहे.

या व्यापाऱ्याने नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी दाखवून ३.२३ कोटी रुपयांची चुकीची कर वजावट घेऊन तसेच मालाशिवाय फक्त बिले देऊन ३.१७ कोटी रुपयांची महसूल हानी केल्याचे निदर्शनास आले.


आरोपींना न्यायालयीन कोठडी


महानगर दंडाधिकारी यांनी आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही धडक कारवाई राज्य कर सहआयुक्त प्रेरणा देशभ्रतार आणि राज्य कर उपायुक्त राजेंद्र टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक राज्यकर आयुक्त डी. के. शिंदे यांनी राबविली.

या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे २०२४-२५ या आर्थिक वर्षात पहिल्याच अटक कारवाईद्वारे करचुकवेगिरी करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com