पक्षांकडून घरोघरी प्रचाराला वेग

पक्षांकडून घरोघरी प्रचाराला वेग

पनवेलमध्ये घरोघरी प्रचाराला वेग
खारघर, ता. १८ (बातमीदार) : विविध पक्षांकडून खारघर, तळोजा आणि कामोठे वसाहतीमध्ये प्रचाराचा नारळ फोडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचार रॅली काढण्यात येत आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा मतदारसंघात पाच लाख ७० हजार मतदार आहेत. पनवेल महापालिका हद्दीतील खारघर, तळोजा, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल आदी सिडको वसाहतींत मतदार संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून विविध मुद्दे समोर आणून प्रचार करण्यात येत आहे. विरोधकांकडून येथील समस्या मांडण्यात येत आहेत; तर सत्ताधाऱ्यांकडून विविध विकासकामांचा लेखाजोखा देण्यात येत आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात खारघर हा मोठा नोड म्हणून ओळखला जातो. खारघरमध्ये भाजपचे ११ माजी नगरसेवक आहेत. दरम्यान, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बूथनुसार तयारी केली आहे. मंगळवारी (१६ एप्रिल) भाजप, सेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासप आदी महायुतीच्‍या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन खारघर सेक्टर २१ मधील ज्ञानसाधना सोसायटीत नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रत्येक सोसायटीत घरोघरी भेट देऊन महायुतीचा प्रचार केला. महाविकास आघाडीकडून प्रचार केला जात आहे. तळोजा आणि कामोठे येथे प्रचार रॅली काढण्यात येत आहे. या रॅलीत महाविकास आघाडीचे सर्व नेते सहभागी होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com