Thane News: किन्हवली पोलिसांकडून गावठी हातभट्टी उद्धवस्त; वाचा कशी केली कारवाई

Thane News: किन्हवली पोलिसांकडून गावठी हातभट्टी उद्धवस्त; वाचा कशी केली कारवाई

चारशे लिटर दारू व २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ऑ Four hundred liters of liquor and valuables worth Rs. 20,000 were seized

किन्हवली, ता. २२ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शाई नदीच्या खोऱ्यात गावठी हातभट्ट्यांवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी दारू बनविण्याचे साहित्य नष्ट करून तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

शाई नदीच्या खोऱ्यात गावठी हातभट्ट्यांवर किन्हवली पोलिसांनी सहायक पोलिस निरीक्षक नितीन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता. २१) सायंकाळी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी गावठी दारूच्या तीन हातभट्ट्या उद्‌ध्वस्त केल्या. चारशे लिटर दारू व २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच नामपाडा येथील तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत. किन्हवली पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या कारवाईत स्वतः सहायक पोलिस निरीक्षक नितीन खैरनार, पोलिस हवालदार ज्ञानदेव शिर्के, पोलिस हवालदार सुहास कांबळे, पोलिस हवालदार सतीश शेलवले, पोलिस हवालदार शरद शिरसाठ आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com