पोलिसाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

पालघर, ता. २६ : पोलिस कर्मचाऱ्याने पाच लाख रुपयांच्या वसुलीसाठी खोट्या पोलिस केसमध्ये अडकविण्याची धमकी देत मारहाण केल्याने एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. व्हिडीओ काढत या तरुणाने झोपेच्या गोळ्या घेतल्या. त्यानंतर बेशुद्धावस्थेत असलेल्या या तरुणाला उपचारासाठी सिल्वासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.


मयूर बागल हा पोलिस कर्मचारी पालघर पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. बागल हे शवाब खतीब आणि त्यांची पत्नी व मुलीच्या मोबाईल नंबरवर फोन करून त्यांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बागल हे शवाब याच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करीत होते. अनेक दिवसांपासून ते शवाब यांच्या कुटुंबातील सदस्यांना फोन करून त्रास देत होते. शुक्रवारी पहाटे दहिसर चेक नाका भागात शवाब याला एका हॉटेलमधून बाहेर काढून मारहाण करत त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा बागल यांनी दम दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. बागल याच्याकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे शवाब याने व्हिडीओमध्ये सांगितले आहे. आत्महत्या करण्यासाठी शवाब खतीब याने झोपेच्या गोळ्या खाल्या असून प्राथमिक उपचारानंतर त्याला उपचारासाठी सिल्वासा येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, मनोर गावातील ख्वाजा नगर डोंगरी भागाचा रहिवासी असलेला शवाब खतीब याचा काही गुन्ह्यांत सहभाग आहे. आरोपीला मयूर बागल याने पाच लाख देण्याचे कारण काय? या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सोबतच पोलिस शिपायाकडे पाच लाख रुपयांची रोख रक्कम आली कुठून, असाही सवाल उपस्‍थित केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com