आजारपणाला कंटाळून एकाची आत्महत्या

आजारपणाला कंटाळून एकाची आत्महत्या

घाटकोपर (बातमीदार) ः शस्त्रक्रियेमुळे होणाऱ्या वेदना सहन होत नसल्याने पवईतील महात्मा फुले नगरमधील ५१ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे ४ वाजता उघडकीस आली. सुभाष गायकवाड असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून फुले नगर वस्तीत पत्नी मुलांसह राहात होते. काही महिन्यांपूर्वी सुभाष यांची बायपास सर्जरी झाली होती. नैसर्गिक विधी करताना त्यांना प्रचंड वेदना होत होत्या. त्यामुळे आजारपणात होणारा त्रास सहन होत नसल्याने सुभाष याने आत्महत्या केली. या प्रकरणाची पार्क साईड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com