जिल्हा रुग्णालयात डॉक्टर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

जिल्हा रुग्णालयात डॉक्टर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील ब्रदर्स (परिचारक) आणि दिव्यांग कर्मचाऱ्याला शनिवारी (ता. २७) पहाटेच्या सुमारास रुग्णाच्या नातेवाइकांनी मारहाण करीत चाकूचा धाक दाखविल्याची घटना घडली. या घटनेचा निषेध करण्यासाठी डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी अकरा वाजता आंदोलन केले. या घटनेमुळे पुन्हा एकदा सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास वागळे इस्टेट येथील एका व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्या रुग्णाला दाखल करून घेत त्यावर उपचार सुरू केले; मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर संतापलेल्या पाच ते सहा नातेवाइकांनी तेथे असलेल्या दिव्यांग कर्मचारी राहुल गायकवाड यांना मारहाण केली. परिचारक किरण पारधे यांना चाकूचा धाक दाखवला. या प्रकारामुळे सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्समध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच यावेळी ड्युटीवरील पोलिस हे हजर नव्हते, असेदेखील रुग्णालय प्रशासनाने सांगितले. त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी सकाळी डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.

रुग्णालयात घडलेला प्रकार हा निंदनीय आहे. रुग्णांच्या नातेवाइकांकडून कर्मचाऱ्यांना मारहाण करणे चुकीचे आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येणार असून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com