पथनाट्यातून मतदानाचे धडे

पथनाट्यातून मतदानाचे धडे

वाशी, ता. २७ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या शाळांप्रमाणेच अनेक खासगी शाळांमधूनही शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येत नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करणारी पथनाट्ये आपापल्या शाळा परिसरात सादर केली. विशेष म्हणजे ही पथनाट्ये शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळूनच लिहिलेली होती व शिक्षकांनी पथनाट्य स्वरूपात बसवून घेतली होती. शिक्षण विभागाचे उपायुक्त योगेश कडुसकर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे, शिक्षण विस्तार अधिकारी सुलभा बारघरे व कल्पना गोसावी यांच्या नियंत्रणाखाली केंद्र समन्वयक यांच्या माध्यमातून महापालिकेच्या शाळांसह खासगी शाळांनाही मतदानविषयक जनजागृतीपर स्वीप कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांमार्फत पालकांकडे मतदान करण्याचा संदेश प्रभावी रितीने पोहचविला जात आहे. शाळांनी आपापल्या क्षेत्रांत सादर केलेली पथनाट्ये ही मतदानविषयक जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com