भामट्याने पळवली अपघातग्रस्त दुचाकीस्वाराची दुचाकी

भामट्याने पळवली अपघातग्रस्त दुचाकीस्वाराची दुचाकी

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २७ : खोणी-तळोजा मार्गावर खोणी गावाजवळ गुरुवारी (ता. २५) मध्यरात्री एका कारने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडला होता. यावेळी जखमीला एका भामट्याने मदत केली, मात्र त्याची दुचाकी चोरून पळ काढल्याची घटना घडली आहे.

जखमी प्रवासी शुद्धीवर आला तेव्हा त्याला आपली दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर या तरुणाने मानपाडा पोलिस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार उमेशकुमार पारसमल दुक्कड (वय ३५) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. ते डोंबिवलीजवळील लोढा आर्केड गृहसंकुलात राहतात. उमेशकुमार हे गुरुवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास तळोजा खोणी रस्त्याने दुचाकीवरून जात होते. यावेळी सुसाट वेगात असलेल्या एका कारचालकाने उमेशकुमार यांच्या दुचाकीला कट मारला. यावेळी उमेशकुमार यांनी दुचाकीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र ते बाजूच्या खड्ड्यात दुचाकीसह पडले.
दरम्यान, तेथून एक पादचारी जात होता. त्याने जखमी उमेशला मदत करण्याच्या बहाण्याने बाजूला असलेल्या एका गॅरेजच्या निवाऱ्याखाली आणून बसविले. त्यानंतर त्यांची रस्त्याच्या कडेला पडलेली दुचाकी सुस्थितीत करून रस्त्यावर आणली. दुचाकी सुस्थितीत असल्याचे पाहून पादचाऱ्याने ती पळवून नेली. बराच उशिराने उमेशकुमारला आपली दुचाकी पादचाऱ्याने पळवून नेल्याचे लक्षात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com