आवक कमी झाल्याने तूरडाळ महागली

आवक कमी झाल्याने तूरडाळ महागली

आवक कमी झाल्याने तूरडाळ महागली
मागील महिन्यापेक्षा दरात १० टक्क्यांनी वाढ

वाशी, ता. २७ (वार्ताहर) : वाशीतील एपीएमसी बाजारात तूरडाळीची आवक घटल्याने तुरडाळीच्या दरात मागील महिन्यापेक्षा १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
सर्वसामान्यांच्या ताटातील डाळ महागच आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत डाळींची आवक घटली असून घाऊक बाजारात डाळींच्या किमती वाढल्या आहेत. रोजच्या जेवणात वापरली जाणारी तूरडाळ ही १०० रुपये प्रति किलोच्या पार गेली आहे. सामान्यतः तूरडाळीचे उत्पादन हे नोव्हेंबर महिन्यात बाजारात दाखल होते. राज्यातील तूरडाळ ही प्रामुख्याने विदर्भातील अकोला, यवतमाळ, मराठवाडा व लातूर या भागातून येत असते. यावर्षी डाळींच्या उत्पादनात सरासरी सात टक्क्यांनी वाढ झालेली असूनदेखील वाढत्या मागणीमुळे डाळींच्या दरात वाढ झाली आहे. सध्या एपीएमसी बाजारात डाळींची आवक घटली आहे. अवकाळी पाऊस आणि वाढती उष्णता याचा परिणाम डाळींच्या उत्पादनावर झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. येत्या महिन्यात डाळींची आवक वाढेल, अशी शक्यताही व्यापाऱ्यांनी वर्तवली असली तरीही डाळींचे दर कमी होण्याची शक्यता नाही, असेही व्यापारी सांगत आहेत. यामुळे गृहिणींचे बजेट बिघडणार असून आतापासूनच गृहिणींनी काटकसर सुरू केल्याने बाजारात डाळींची खरेदी कमी झालेली दिसत आहे. त्याचसोबत डाळींचे दर वाढल्याने किरकोळ व्यापारीदेखील घाऊक व्यापाऱ्यांकडून कमी माल घेत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

तुरीच्या डाळीची किंमत मालाच्या गुणवत्तेनुसार ७० ते १४० रुपये किलो इतकी असते. मात्र, एपीएमसी बाजारात तूरडाळीची किंमत ही दीडशे रुपयांच्या पुढे गेली आहे. बुधवार (ता. २६) एपीएमसीच्या बाजारात तुरीच्या डाळीचे दर ११० ते १७० रुपये किलो इतके आहेत. तर हरभरा डाळीची किंमत ६८ ते ८५ रुपये किलो इतकी आहे. तर मसूर डाळदेखील ७१ ते ११५ रुपये किलोने विकली जात आहे. मूग डाळीची किंमत ९९ ते १४० रुपये किलो झाली असून उडीद डाळीचा दर ८३ ते ११५ रुपये किलो इतका आहे. त्याचसोबत चवळी ८० ते १३५ रुपये किलोने विकली जात आहे.

मुंबईत गेल्या वर्षीपर्यंत १५ टन तूरडाळ येत होती. मात्र, दरवाढ झाल्यामुळे ही आवक कमी झाली. ही आवक आता अवघ्या तीन टनांवर आली आहे. मात्र, मुंबईकरांची डाळीची मागणी ही पाच टनांपेक्षा जास्त आहे. दर जास्त असल्याने किरकोळ व्यापारी कमी प्रमाणात डाळ खरेदी करतात. सोबत डाळ टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याकडे किरकोळ विक्रेत्यांचा दृष्टिकोन असून टंचाईसदृश स्थिती नाही.
- अमरिश बरोत, घाऊक किराणा व्यापारी, एपीएमसी


लहान व्यापारी, किरकोळ विक्रेते व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सुपर मार्केटचे साखळी दुकानदारांना १५ एप्रिलपर्यंत त्यांच्याकडील तूरडाळीचा साठा सरकारने घोषित करण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारने सर्व विक्रेते, गोदाम मालक, मिल मालकांना तूरडाळीचा साठा घोषित करण्याची सूचना दिल्या असून विक्रेत्यांना लवकरच साठामर्यादा लागू होण्याची शक्यता असल्याचे अखिल भारतीय व्यापारी महासंघाने म्हटले आहे.
- शंकर ठक्कर, सचिव, महाराष्ट्र, भारतीय व्यापारी महासंघ (कॅट)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com