शरद पवार पक्षाची जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर

शरद पवार पक्षाची जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर

कल्याण, ता. २७ (वार्ताहर) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवीन जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये १६ उपाध्यक्ष, सात सरचिटणीस, १२ सचिव, सहा संघटक सचिव, चार कार्यकारणी सदस्य, एक खजिनदार, एक बूथ कमिटी समन्वयक; तसेच चार विधानसभा अध्यक्ष आणि चार विधानसभा कार्याध्यक्ष अशी एकूण ५७ पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यामुळे कल्याण-डोंबिवली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला आहे. याप्रसंगी कल्याण, डोंबिवलीमधील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com