गौण खनिजाची बेकायदा वाहतूक

गौण खनिजाची बेकायदा वाहतूक

नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : राज्य सरकारचा महसूल बुडवून अवैध मार्गाने खडीची वाहतूक करणारा डम्पर महसूल विभागाच्या पथकाने कारवाईसाठी ताब्यात घेतला होता; मात्र चालकाने तपासणी पथकासमोरूनच डम्पर घेऊन पलायन केल्याचा प्रकार खारघर येथे घडला आहे. खारघर पोलिसांनी पळून गेलेल्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
काही टोळ्या गौण खनिजाचे अनधिकृत उत्खनन करून त्याची बेकायदा वाहतूक करून नेत असल्याची माहिती पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी अनधिकृत गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंडळ अधिकारी व तलाठी आदींचे पथक २४ एप्रिल रोजी सायंकाळी खारघर येथे गेले होते. या वेळी ओवेगाव ते पापडीचा पाडा या रस्त्यावरील खुटुकबंधन गावाजवळ एक डम्पर सहा ब्रास गौण खनिज खडी घेऊन जात असल्याचे या पथकाला निर्दशानास आले. त्यामुळे महसूल विभागाच्या पथकाने डम्पर अडवून त्याच्याकडे गौण खनिजाच्या रॉयल्टी पावतीबाबत विचारणा केली. त्यावेळी चालकाने खडीची रॉयल्टी सरकारकडे भरली नसल्याचे सांगितले.
-------------
पोलिसांच्या हातावर तुरी
महसूल विभागाच्या पथकाने डम्परचालकाला वाहन घेऊन पुढील कार्यवाहीकरिता पनवेल येथील तहसीलदार कार्यालयात येण्याचे आदेश दिले; मात्र त्याने महसूल विभागाच्या पथकासमोर खडीने भरलेला डम्पर घेऊन त्या ठिकाणावरून पलायन केले. त्यामुळे महसूल विभागाने पळून गेलेल्या डम्परचालकाविरोधात खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com