आदित्य बिर्ला सनलाईफला ७८० कोटींचा नफा
७८० कोटी रुपये नफा

आदित्य बिर्ला सनलाईफला ७८० कोटींचा नफा ७८० कोटी रुपये नफा

मुंबई, ता. २८ ः आदित्य बिर्ला सनलाईफ एएमसीला या वर्षात ७८० कोटी रुपये एवढा सर्वोच्च नफा मिळाला असून तो गेल्या वर्षीपेक्षा ३१ टक्के जास्त आहे. मार्च अखेरच्या तिमाहीचा त्यांचा करोत्तर नफा २१० कोटी रुपये एवढा झाला असून तो मागील वर्षीपेक्षा ५४ टक्के जास्त आहे. या वर्षात त्यांना १६४ कोटी रुपये एकूण महसूल मिळाला असून तो गेल्या वर्षीपेक्षा २१ टक्के जास्त आहे.

या वर्षासाठी कंपनीने प्रतिशेअर साडेतेरा रुपये एवढा लाभांश प्रस्तावित केला आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाखालील म्युच्युअल फंडांची मालमत्ता २१ टक्क्यांनी वाढली असून मार्च अखेरीस संपलेल्या तिमाहीत या मालमत्तेचे मूल्य ३,३१७ अब्ज रुपये एवढे झाले आहे; तर आदित्य बिर्ला सनलाईफ एमसीच्या अधिपत्याखालील एकूण मालमत्ता ३,४५८ अब्ज रुपये झाली आहे.

मार्च २०२४ अखेरीस त्यांच्या एसआयपी मालमत्तेचे मूल्य एक हजार २५२ कोटी रुपये एवढे असून ते मागील वर्षीपेक्षा २५ टक्के जास्त आहे. मार्च अखेरीस त्यांच्याकडे पाच लाख ९६ हजार ४९९ नवे एसआयपी गुंतवणूकदार नोंदवले गेले. आतापर्यंत कंपनी ८५ लाख ९० हजार गुंतवणूकदारांना सेवा देत असून या वर्षात त्यांनी अकरा लाख नवीन गुंतवणूकदार नोंदवून घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com