Crime News:
Crime News:sakal

Crime News: पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दोघांना अटक; वाचा नेमकं काय घडल?

Navi Mumbai: सिग्नल तोडून जाणाऱ्या दुचाकीवरील तरुणांना कारवाईसाठी थांबवणाऱ्या वाहतूक पोलिसाचा दुचाकीवरील दोघा तरुणांनी गळा पकडून त्यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याची घटना गत शुक्रवारी (ता. २६) दुपारी वाशीमध्ये घडली.

जयेश लोंढे (२२) व रोहित लोंढे (२३) अशी वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. वाशी पोलिसांनी या दोघा भावांविरोधात सरकारी कामात अडथळा आणून मारहाण तसेच शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे.

Crime News:
Navi Mumbai Accident : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; महापे शिळफाटा मार्गावर झाला अपघात


तक्रारदार पोलिस हवालदार रवींद्र पाटील हे वाशी वाहतूक शाखेत कार्यरत असून शुक्रवारी ते पोलिस शिपाई कोळी यांच्यासोबत वाशीतील ब्ल्यू डायमंड चौकात कार्यरत होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कोपरखैरणेकडून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीवरील जयेश लोंढे व रोहित लोंढे या दोघांनी तेथील सिग्नल जम्प केला.

त्यामुळे पोलिस हवालदार पाटील यांनी त्यांना थांबवण्याचा इशारा केला असता, दोघा भावांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीचे चाक पाटील यांच्या बुटावर घातले. त्यामुळे पाटील यांनी त्यांच्या दुचाकीचे कॅरी हँन्डल पकडून ठेवल्यामुळे गाडी घसरून खाली पडली. त्यानंतर दोघा भावांनी हवालदार पाटील यांची कॉलर पकडून त्यांचा गळा दाबला, तसेच शिवीगाळ करत त्यांच्यासोबत धक्काबुक्की केली.

Crime News:
Navi Mumbai Accident : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; महापे शिळफाटा मार्गावर झाला अपघात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com