Raigad Loksabha: तटकरेंना निवडणूक जिंकणं सोप्पं नाही? महायुतीत समन्वयाचा अभाव;वाचा संपूर्ण बातमी

Raigad Loksabha: तटकरेंना निवडणूक जिंकणं सोप्पं नाही? महायुतीत समन्वयाचा अभाव;वाचा संपूर्ण बातमी

महेंद्र दुसार : सकाळ वृत्तसेवा

Alibag News: रायगडमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात, ७ मे रोजी मतदान होणार आहे. प्रचारासाठी केवळ आठ दिवस शिल्लक आहेत; मात्र, या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या समोरील अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत. भाजपच्या नेतृत्वाखालील अनेक पक्षांची ताकद सुनील तटकरेंच्या मागे असली तरी कार्यकर्त्यांमधील समन्वयाअभावी मतदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण कायम आहे. (raigad loksaha)

हे टाळण्यासाठी अखेर महायुतीच्या नेत्यांनी सोमवारी (ता. २९) अलिबाग येथे समन्वय समितीची बैठक प्रवीण दरेकरांच्या उपस्थितीत घ्यावी लागली.

Raigad Loksabha: तटकरेंना निवडणूक जिंकणं सोप्पं नाही? महायुतीत समन्वयाचा अभाव;वाचा संपूर्ण बातमी
Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीची आज पुण्यात सभा

बैठकीत भाजपचे आमदार बाळासाहेब पाटील, अलिबागचे महेंद्र दळवी, आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मनसे, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यासह महायुतीला सहकार्य करणाऱ्या संघटना, त्‍यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्‍यानंतर तीन वाजता पत्रकार परिषदही घेण्यात आली. या वेळी प्रवीण दरेकर म्‍हणाले, आधीच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील सर्वच पक्ष कधीना कधी एकमेकांविरोधात लढले आहेत.

त्‍यामुळे नेते-कार्यकर्ते एकमेकांचे कट्टर विरोधक असताना, आता एकत्र काम करताना अडचणी येणे साहजिकच आहे. या अडचणी दूर करून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारताचा अजेंडा मतदारांपर्यंत नेण्यास सहकार्य करावे, असे आवाहन दरेकरांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना केले.

Raigad Loksabha: तटकरेंना निवडणूक जिंकणं सोप्पं नाही? महायुतीत समन्वयाचा अभाव;वाचा संपूर्ण बातमी
Loksabha Election 2024 : पुण्यात ३५, शिरूरमध्ये ३२ उमेदवार रिंगणात

मतदानासाठी अवघे आठ दिवस शिल्‍लक असून यादरम्‍यान प्रचारसभांचे, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन करावे. यासाठी समन्वय समिती स्‍थापन करण्यात आली असून प्रत्येक विभागातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात येणार आहे.

इंडिया आघाडीकडे विकासाचे मुद्दे नाहीत
प्रवीण दरेकर यांनी, इंडिया आघाडीकडून मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणाची प्रयत्न केला जात असल्याचा आरोप बैठकीत केला. इंडिया आघाडीकडे विकासाचे कोणतेच मुद्दे नसल्याने असे केविलवाणे आरोप केले जात आहेत. याचा कोणताही परिणाम महायुतीच्या उमेदवाराला मिळणाऱ्या मतांवर होणार नाही, असे सांगितले.

Raigad Loksabha: तटकरेंना निवडणूक जिंकणं सोप्पं नाही? महायुतीत समन्वयाचा अभाव;वाचा संपूर्ण बातमी
Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com