mumbai news
mumbai news sakal

Mumbai News: उद्धव ठाकरे तुम्ही कफन चोर आहात, फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा

Mumbai News: महाराष्ट्र हे देशातले क्रमांक एकचे राज्य आहे, मात्र ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर असतानाच्या कार्यकाळात घसरले. त्यामुळे आता ते पुन्हा क्रमांक एकवर राहण्यासाठी व विकासाचे वातावरण निर्माण करणाऱ्या भाजपला मतदान करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ते भाजपने मुंबईत आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. आज महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर भाजपने एक हजार ठिकाणी महाराष्ट्र दिन साजरा केला.

mumbai news
Mumbai News: पाकिस्तानात अडकलेल्या ‘त्या’ खलाशावर अखेर मुंबईमध्ये झाले अंत्यसंस्कार


कोरोना काळात जी लस तयार करण्यात आली, त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. त्यावरून उद्धवजी ‘तुमको मिर्ची लगी तो, मैं क्या करू?’ तसेच कोरोनाच्या काळात तुम्ही खिचडी, कफन चोरी करत होता. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे तुम्ही, लोक मरत असताना ते उपाशी असताना घोटाळे करत होता.

बॉडी बॅगचा घोटाळे करणारे तुम्ही कफन चोर आहात, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.

mumbai news
Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

मुंबई भाजपच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात आज ते बोलत होते. दादर येथील कामगार मैदानावर मेळावा पार पडला. यावेळी महायुतीचे लोकसभा उमेदवार पियूष गोयल, उज्ज्वल निकम आणि मिहीर कोटेचा उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांना आपल्या गटाचा पाठिंबा जाहीर करताना म्हणाले की, वर्षाताई आता मी तुझा मतदार आहे. तुझ्या पंजाचे बटण दाबून मी काँग्रेसला मतदान करणार, असे म्हटले होते. त्यावरूनही त्यांनी त्यांच्यावर शरसंधान साधले. वंदनीय बाळासाहेब यांच्या आत्म्याला काय वाटले असेल, असा उपरोधिक सवालही त्यांनी यावेळी केला.

mumbai news
Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com