Mumbai Local News: गर्दुल्यांची प्रवाशांमध्ये दहशत; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू
Mumbai Local News: sakal

Mumbai Local News: गर्दुल्यांची प्रवाशांमध्ये दहशत; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू

Thane News: चाकरमान्यांची लाईफलाईन समजली जाणाऱ्या मध्य रेल्वेत गर्दुल्यांच्या दहशतीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. धावत्या लोकलमध्ये प्रवाशांना लुटणाऱ्यांना विरोध केल्याने चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. खडवली-वासिंद स्थानकादरम्यान ही घटना घडली.

Mumbai Local News: गर्दुल्यांची प्रवाशांमध्ये दहशत; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू
Nashik Crime News : नानावलीतून प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हेशाखा युनिट एकच्या कारवाईत एकाला अटक

शहापूरजवळील सरवली गावात राहणारे दत्तात्रय भोईर २७ एप्रिल रोजी आपल्या एका नातेवाईकाच्या हळदीसाठी उल्हासनगर येथे आले होते. रात्री घरी जाण्यासाठी त्यांनी कल्याणहून कसाराकडे जाणारी लोकल पकडली होती. यावेळी खडवली आणि वासिंद रेल्वेस्थानकाच्या दरम्यान मध्यरात्री तीन ते चार नशेखोर तरुणांनी हैदोस घालण्यास सुरुवात केली.

Mumbai Local News: गर्दुल्यांची प्रवाशांमध्ये दहशत; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू
Mumbai Local News: लोकल अपघातानंतर रेल्वे महाव्यवस्थापकांनी घेतला महत्वाचा निर्णय, दिला हा आदेश

या तरुणांनी बसलेल्या प्रवाशांच्या मोबाईल आणि सोन्याच्या चेन खेचण्याचा प्रयत्न केला होता. तसेच जे प्रवासी त्यांना विरोध करत होते. त्यांना चाकूचा धाक दाखवत मारहाण करण्यात येत होती. यावेळी त्याच डब्यात प्रवास करणाऱ्या भोईर यांनी गर्दुल्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण एका तरुणाने त्यांच्यावर चाकूने वार केले. जखमी अवस्थेत भोईर यांना ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादम्यान चार दिवसांनी गुरुवारी (ता. २) सकाळी ६ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

Mumbai Local News: गर्दुल्यांची प्रवाशांमध्ये दहशत; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू
Mumbai Local News : ...अन् रिया घरी परतलीच नाही! डोंबिवलीच्या तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com