अमित शहा यांच्या दौऱ्याने पर्यावरणाची जाग

अमित शहा यांच्या दौऱ्याने पर्यावरणाची जाग

वसई, ता. १३ (बातमीदार) : एकीकडे प्रदूषण वाढत असताना उपायोजना कमी पडत आहेत. त्यामुळे धूलिकणांचा प्रभाव वाढत आहे. सखोल स्वच्छता मोहीमही अस्वच्छतेपुढे नतमस्तक झाली आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री आणि स्टार प्रचारक अमित शहा यांचा वसईत सोमवारी (ता. १३) दौरा होता. त्यामुळे अचानक यांत्रिकी झाडू रस्त्यावर फिरू लागले. यानिमित्त पर्यावरणाबाबत उशिरा का होईना पालिकेला जाग आली. असे मंत्री रोज वसई-विरार शहरात आले, तर स्वच्छता राहील आणि प्रदूषण कमी होईल, अशी चर्चा रंगू लागली आहे.
वसई-विरार शहरात धूलिकणांचा प्रभाव, अनेक ठिकाणी अस्वच्छता दिसून येत असते. रस्तेही धुळीने व्यापले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करत प्रवास करावा लागतो. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने नेहमी प्रदूषण कमी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. क्षेपणभूमीबाबतही जाग आणली. महापालिका प्रशासनाकडून अनेक ठिकाणी रस्त्यांचे काम सुरू आहे. यावेळी मातीचे ढिगारेही पसरले आहेत, तर धूलिकण हवेत मिसळत आहे. त्यातच यांत्रिकी झाडूने साफसफाई करण्यासाठी वाहने खरेदी केली आहेत. मात्र, अनेकदा ही वाहने रस्त्यावर दिसत नाहीत. कधी कधी बिघाडही होत असतो; मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिग्गज नेते वसईत दाखल होणार, याची माहिती मिळताच सोमवारी साफसफाई मोहीम हाती घेण्यात आली. त्यांच्या मार्गावर कुठेही अस्वच्छता दिसून नये, याची पुरेपूर काळजी प्रशासनाने घेतली. त्यामुळे हा दौरा पर्यावरणपूरक करण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला. अशीच दैनंदिन यांत्रिकी झाडूने वसई-विरार शहरात साफसफाई कधी होणार, असा सवाल सुजाण नागरिकांतून उपस्थित होत आहे.
--------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com