Mumbai Loksabha: लोकसभेत झालेल्या मतदानानुसार आशिष शेलार डेंजर झोनमध्ये, तर इतर आमदारांनाही धक्का

Mumbai Loksabha: लोकसभेत झालेल्या मतदानानुसार आशिष शेलार डेंजर झोनमध्ये, तर इतर आमदारांनाही धक्का

Maharashtra Vidhansabha News: उज्ज्वल निकम यांना मिळवलेली आघाडी तोडून गायकवाड यांना विजय मिळवणे शक्य झाले |

Mumbai News Vidhansabha : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना भाजपचेच आमदार असलेल्या वांद्रे पश्चिम आणि शिवसेना (शिंदे) यांच्या मतदारसंघात काँग्रेसकडून धोबीपछाड मिळाला आहे.

कुर्ला, कलिना आणि वांद्रे पूर्व या तीन मतदारसंघांत गायकवाड यांनी आघाडी घेतली आहे. उज्ज्वल निकम यांना विलेपार्ले या एकमेव मतदारसंघात आघाडी घेता आली. गायकवाड यांना मराठी, हिंदी भाषक, मुस्लिम समाजाने मतदान केल्याचे आकडेवारीतून समजते. त्यामुळे उज्ज्वल निकम यांनी मिळवलेली आघाडी तोडून गायकवाड यांना विजय मिळवणे शक्य झाले.

Mumbai Loksabha: लोकसभेत झालेल्या मतदानानुसार आशिष शेलार डेंजर झोनमध्ये, तर इतर आमदारांनाही धक्का
सावंतांना तज्ज्ञ समितीपेक्षा अधिक अक्कल आहे का? मेट्रो कारशेडप्रश्‍नी आशीष शेलार यांचा सवाल

यांची आमदारकी धोक्यात

मतदारसंघ- वांद्रे पश्चिम
आमदार- आशीष शेलार, भाजप
या मतदारसंघात उज्ज्वल निकम हे ६ हजार ३९४ मतांनी पिछाडीवर होते. येथे वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेतली. विधानसभा निवडणुकीत ही पिछाडी भरून काढण्याचे आव्हान मुंबईचे भाजप अध्यक्ष असलेल्या आशीष शेलार यांच्यापुढे राहणार आहे.
एकूण मतदान  - १,४७,०४३
उज्ज्वल निकम - ७२,९५३
वर्षा गायकवाड - ७३,३४७

मतदारसंघ- चांदिवली
आमदार- दिलीप लांडे, शिवसेना
चांदिवली मतदारसंघात दिलीप लांडे आपल्या उमेदवाराला चांगल्या मतांची आघाडी मिळवून देतील, असे वाटत असताना येथे उज्ज्वल निकम हे तब्बल ४ हजार ३२४ मतांनी पिछाडीवर पडले. येथून वर्षा गायकवाड यांना अनपेक्षित आघाडी मिळाली आहे. दिलीप लांडे हे विधानभेत जेमतेम मतांनी निवडून आले होते. आता घेतलेल्या आघाडीमुळे लांडे यांच्यापुढे आगामी विधानसभेचा मार्ग खडतर राहणार आहे.
एकूण मतदान  - २,१०,५२८
उज्ज्वल निकम - ९८,६६१
वर्षा गायकवाड- १,०२,९८५
.........

मतदारसंघ- कुर्ला
आमदार- मंगेश कुडाळकर, शिवसेना
शिंदे गटाच्या आमदारांच्या या मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना तब्बल २३,५६४ इतक्या भरघोस मतांची लिड मिळाली. एवढी लिड भरून काढणे हे कुडाळकर यांच्यासाठी सोपे गणित नसणार आहे.
एकूण मतदान- १,२३,९६८
वर्षा गायकवाड - ८२,११७
उज्ज्वल निकम - ५८,५५३
...................
या आमदारांनी किल्ला राखला
मतदारसंघ- वांद्रे पूर्व
आमदार- झिशान सिद्दीकी, काँग्रेस
मुस्लिमबहुल असलेल्या या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना सर्वाधिक आणि निर्णायक २७,४६२ मतांची आघाडी मिळवत जोरदार मुसंडी मारली.
एकूण मतदान- १,२७,८६५
वर्षा गायकवाड - ७५,०१३
उज्ज्वल निकम -  ४७,५५१
..........................
मतदारसंघ- कलिना
आमदार- संजय पोतनीस, शिवसेना उबाठा
या मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना १६,२८२ मतांची आघाडी मिळवून दिली.

एकूण मतदान- १,२३,९६८
वर्षा गायकवाड - ६७,६२०
उज्ज्वल निकम - ५१,३३८

Mumbai Loksabha: लोकसभेत झालेल्या मतदानानुसार आशिष शेलार डेंजर झोनमध्ये, तर इतर आमदारांनाही धक्का
आशीष शेलार यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न

मतदारसंघ- विलेपार्ले 
आमदार- पराग अळवणी, भाजप
या मराठीबहुल मतदारसंघातून भाजपच्या उज्ज्वल निकम यांना ५२,३२५ मतांची आघाडी मिळाली आहे. ही निकम यांना मिळालेली एकमेव आघाडी आहे.

एकूण मतदान- १,५१,०५६
उज्ज्वल निकम - ९८,३४१
वर्षा गायकवाड - ४६,०१६

उत्तर मध्य मुंबई
एकूण मतदान- ९,१०,७४२
विजयी - वर्षा गायकवाड, काँग्रेस - ४,४५,५४५
पराभूत - ॲड. उज्ज्वल निकम, भाजप - ४,२९,०३१

Mumbai Loksabha: लोकसभेत झालेल्या मतदानानुसार आशिष शेलार डेंजर झोनमध्ये, तर इतर आमदारांनाही धक्का
Ashish Shelar : सत्तेत असो वा नसो हिंदू जागरण करणारच : आशीष शेलार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com