तलावांत क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

तलावांत क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

तलाव क्षेत्रांत पावसाचा जोर वाढला
मुंबईकरांसाठी दिलासा; पाणीसाठा तीस दिवस पुरणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबईत शनिवारी (ता. ६) मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढू लागला असून तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने जोर धरला आहे. हे दिलासादायक चित्र असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. मुंबईत जून महिन्यात पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये अपेक्षित असा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे मुंबईत आजही १० टक्के पाणीकपात सुरूच आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबईतील विहार आणि तुळशी तलाव परिसरात कमी पाऊस झाला असला तरी तीन दिवसांमध्ये मात्र प्रमुख तलावांमध्ये चांगला पाऊस झाला आहे.

ठाणे, पालघर, नाशिक जिल्हा परिसरातील पाच प्रमुख तलावांमध्ये शनिवारपासून पावसाचा जोर वाढू लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही बाब दिलासा देणारी आहे.

गेल्या ९ जूनपासून मुंबई आणि परिसरात रिमझिम पाऊस पडत असून ३० जून उलटूनही मुंबईकरांना आणि महापालिकेला अपेक्षित असा पाऊस तलावांच्या पाणलोट क्षेत्रात झालेला नाही. त्यामुळे मुंबईला दररोज तीन हजार ८५० दशलक्ष आणि भिवंडी, निजामपूर महापालिकेला दररोज १५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांतील पाणीसाठ्याच्या पातळीत अपेक्षित वाढ झालेली नाही.

सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत एक लाख २१ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा आहे. हा पाणीसाठा पुढील ३० दिवस म्हणजे १ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com