विलंबशुल्काविरोधात रिक्षाचालकांची निदर्शने

विलंबशुल्काविरोधात रिक्षाचालकांची निदर्शने

Published on

कल्याण (वार्ताहर) : योग्यता प्रमाणपत्रासाठी (रिक्षा टॅक्सी फिटनेस) प्रतिदिन ५० रुपये विलंब शुल्क आकारण्यात येत होते. या निर्णयाचा भाजप वाहतूक संघटना रिक्षा टॅक्सी संघर्ष कृती समितीने निदर्शने करत विरोध केला आहे. राज्यात वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रासाठी प्रतिदिन पन्नास रुपये विलंब शुल्क आकारण्यात येत असल्या कारणाने रिक्षा, टॅक्सी चालकांमध्ये संताप आहे. या निर्णयाविरोधातील नाराजी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी कल्याणमधील रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघर्ष कृती समितीकडून सोमवारी एक दिवसीय निदर्शने करण्यात आली. तसेच केंद्र सरकार, राज्य सरकारने या निर्णयाबाबत फेरविचार केला नाही तर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.