

स्मार्ट टीव्ही, मोबाईलपेक्षा ध्येय स्मार्ट ठेवा
आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू सिमरत गायकवाड यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
खोपोली, ता. ३ (बातमीदार) ः आजच्या काळात स्मार्ट टीव्ही, मोबाईल मोठ्या प्रमाणावर वापरले जातात, परंतु विद्यार्थ्यांनी आपले ध्येय स्मार्ट ठेवल्यास चांगला खेळाडू घडू शकतो. त्यामुळे चांगला विरंगुळा जोपासा, यश नक्कीच मिळेल असे मत जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या, आंतराष्ट्रीय कबड्डी मार्गदर्शन सिमरत गायकवाड यांनी व्यक्त केले. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाळा-महाविद्यालयांचे एकत्रित वार्षिक क्रीडा महोत्सव २०२४-२५ चा शानदार उद्घाटन सोहळा नुकतेच सिमरत गायकवाड यांच्या हस्ते पार पडला. त्या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
या वेळी त्या पुढे म्हणाल्या की, मैदानी खेळाबरोबर आरोग्य आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी योग्य आहार, झोप घ्या, असा कानमंत्र सिमरत गायकवाड यांनी या वेळी दिला. या सोहळ्यावेळी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके दाखवून उपस्थित पाहुण्यांची मने जिंकली. संस्थेने ६० ते ६५ वर्षांच्या काळात अनेक खेळाडू निर्माण केले आहेत. शाळांमधील स्पर्धांमधून तालुका, जिल्हा, राज्य, देशपातळीवर विद्यार्थी कसे पोहोचतील यासाठी क्रीडा शिक्षक मेहनत घेत असल्याचे संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील यांनी सांगितले. संस्थेत शिकलेले पद्माकर गायकवाड क्रीडा शिक्षक झाले. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविल्याचे सांगत आपल्या संस्थेत असलेल्या क्रीडा साहित्यांचा फायदा घ्या, असे आवाहन पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले, तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीशी संस्था कायम असेल, असे संचालकांनी या वेळी विद्यार्थ्यांना आश्वासन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.