

कांदिवलीत मराठी गझल सोहळा
मालाड, ता. १८ (बातमीदार) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या निमित्ताने गझलकार भागवत बनसोडे, सुनील ओवाळ, गौतम सकपाळ यांच्या दर्जेदार गझलांची संगीत मैफल ‘मराठी गझल सोहळा’ शनिवारी (ता. २९) सायंकाळी सहा वाजता समता विद्यामंदिर सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, समता नगर, कांदिवली पूर्व येथे आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गझलसम्राट सुरेश भटांनी गझलरत्न उपाधी दिलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गझल गायक व संगीतकार रविराज नासेरी यांनी स्वरबद्ध केलेल्या मराठी गझला स्वतः रविराज नासेरी व स्वरा सुनील सादर करणार आहेत. या सोहळ्यासाठी प्रवेश मोफत असून, गझल रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.