mhada
mhadasakal

म्हाडा राज्यात १९ हजार घरं बांधणार, मुंबई-पुण्यात किती?

MHASA Houses in Mumbai, Pune, Konkan : म्हाडा येत्या आर्थिक वर्षात तब्बल १९ हजार ४९७ घरे बांधणार आहे. त्यापैकी एकट्या मुंबईत ५,१९९ घरे असणार आहेत.
Published on

मुंबई, ता. ३१ : सर्वसामान्यांचे गृहस्वप्न पूर्ण करणारे म्हाडा येत्या आर्थिक वर्षात तब्बल १९ हजार ४९७ घरे बांधणार आहे. त्यापैकी एकट्या मुंबईत ५,१९९ घरे असणार आहेत. त्यासाठी म्हाडाने तब्बल नऊ हजार २०२ कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर म्हाडा प्राधिकरणाने १५ हजार ९५१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात सामान्यांना म्हाडाची मुबलक घरे उपलब्ध होणार आहेत.

म्हाडा प्राधिकरणाने २०२५-२०२६च्या १५,९५१.२३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला आणि २०२४-२५च्या १०,९०१.०७ कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार मुंबई मंडळाअंतर्गत ५,१९९ सदनिकांची उभारणी केली जाणार असून, त्याकरिता ५,७४९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याशिवाय म्हाडाच्या इतर मंडळांतील घरांच्या बांधकामांसाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे. दरम्यान, म्हाडाची मुंबई वगळता कोकण, पुणे मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात घरे पडून आहेत. तरीही म्हाडा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने घरे का बांधणार आहे, असा प्रश्न सामान्यांकडून व्यक्त केला जात आहे.

तरतूद अशी
मंडळ- घरे- रक्कम (कोटी रुपयांत)
- कोकण मंडळ - ९,९०२ - १,४०८
- पुणे मंडळ - १,८३६ - ५८५.९७
- नागपूर मंडळ - ६९२ - १,००९
- छत्रपती संभाजीनगर मंडळ - १,६०८ - २३१
- नाशिक मंडळ - ९१ - ८६
- अमरावती मंडळ - १६९ - ६५.९६

mhada
Property Price Hike : स्वप्नातील घरकुल महागले, रेडीरेकनरचे दर ५.९५ टक्क्यांनी वाढले; आजपासून नवे दर लागू

विविध प्रकल्पांसाठी निधी
मुंबई मंडळातर्फे अर्थसंकल्पात वरळी, नायगाव, परळ बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेसाठी २,८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
जोगेश्वरी पूर्व येथील पीएमजीपी कॉलनी पुनर्विकास प्रकल्पासाठी ३५० कोटी रुपये, वांद्रे पश्चिम येथील परिध खाडी पुनर्विकास प्रकल्पासाठी २०५ कोटी रुपये, गोरेगाव सिद्धार्थनगर येथे सदनिका उभारणीसाठी ५७३ कोटी रुपयाची तरतूद केली आहे. परळ येथील जिजामातानगर येथील भूखंडावर मुले व मुलींच्या निवासासाठी वसतिगृह उभारणीसाठी २० कोटी रुपये, गिरणी कामगारांच्या घरांसाठी ५७.५० कोटी रुपये, बोरिवली सर्व्हे क्रमांक १६० वरील योजनेसाठी २०० कोटी रुपये, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील पुनर्वसन प्रकल्पासाठी २०० कोटी रुपये, पहाडी गोरेगाव प्रकल्पासाठी १७७.७९ कोटी रुपये, मालवणी झोपडपट्टी सुधार प्रकल्पासाठी ५० कोटी रुपये, मागाठाणे बोरिवली योजनेसाठी ८५ कोटी रुपये, एक्सर बोरिवली तटरक्षक दल योजनेसाठी ३० कोटी रुपये, गोरेगाव सिद्धार्थनगर (पत्रा चाळ) पुनर्विकास प्रकल्पासाठी २० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

ठाण्यात हेल्थ केअर, वृद्धाश्रम
कोकण मंडळांतर्गतच्या पाचपाखाडी-ठाणे सावरकर नगर येथे दोन मजल्यांचे हेल्थ केयर सेंटर व निवासी घरकुल योजनेसाठी १५ कोटी रुपये, माजिवडे-ठाणे विवेकानंदनगर येथे १०० खाटांचे वृद्धाश्रम व काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह उभारणीसाठी ३० कोटी रुपये, विरार बोळिंज येथे क्लब हाऊस, जलतरण तलाव व भूखंड विकसित करणे कामासाठी ३३.८५ कोटी रुपये, वर्तकनगर-ठाणे पोलिस वसाहत इमारतींचा पुनर्विकास कामासाठी ९० कोटी रुपये आणि गोठेघर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेसाठी ११५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com