तक्रार निवारणात पश्चिम रेल्वे अव्वल

तक्रार निवारणात पश्चिम रेल्वे अव्वल
Published on

तक्रार निवारणात पश्चिम रेल्वे अव्वल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : रेल्वे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेने तक्रार निवारण प्रक्रियेत अभूतपूर्व सुधारणा केली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान खानपान सेवा, तिकीट तपासणी आणि विविध सुविधांसंदर्भात प्रवासी ‘रेल मदत’ ॲपद्वारे तक्रारी नोंदवतात. या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यात पश्चिम रेल्वेने देशभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
रेल मदत ॲपद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींना प्राधान्याने सोडवण्यासाठी पश्चिम रेल्वे विशेष प्रयत्न करत आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तक्रारींच्या त्वरित निवारणात पश्चिम रेल्वे आघाडीवर राहिली आहे. २०२३-२४ या वर्षात तक्रार निवारण कार्यक्षमता निर्देशांक (जीआरईआय) स्कोअर ०.९६ सह पश्चिम रेल्वेने सर्व विभागीय रेल्वेमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. एप्रिल २०२४मध्ये प्रतिदशलक्ष प्रवासी २१९ तक्रारी नोंदल्या गेल्या होत्या, तर फेब्रुवारी २०२५मध्ये हे प्रमाण १४१पर्यंत खाली आले आहे. तसेच तक्रार निवारणाचा सरासरी कालावधीदेखील कमी झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.
...
समस्यांचे जलद निराकरण
पश्चिम रेल्वेने तक्रारींवर त्वरित लक्ष ठेवण्यासाठी सर्व सहा विभागांमध्ये वॉर रूम स्थापन केले आहेत. येथे रिअल-टाइम तक्रारींवर देखरेख ठेवली जाते व प्रवाशांच्या समस्यांचे जलद निराकरण सुनिश्चित केले जाते. २०२३मध्ये पश्चिम रेल्वेने ४७,१२० तक्रारी हाताळत १,१७० दशलक्ष प्रवाशांना सेवा दिली. २०२४मध्ये प्रवासीसंख्या १,२४७ दशलक्षांवर पोहोचली असून ४१,६८० तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com