

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती
वडोदराजवळ ७० मीटर लांबीचा ‘मेक इन इंडिया’ स्टील पूल लॉन्च
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना वेग आला असून, या प्रकल्पासाठी वडोदराजवळील डीएफसीसीआयएल ट्रॅकवर ७० मीटर लांबीचा ‘मेक इन इंडिया’ स्टील पूल नुकताच यशस्वीपणे लॉन्च करण्यात आला आहे.
गुजरातमध्ये उभारण्यात आलेला हा सातवा स्टील पूल असून, संपूर्ण बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी एकूण २८ स्टील पूल उभारण्यात येणार आहेत. आतापर्यंत तयार झालेल्या सात पुलांमध्ये एकत्रितपणे १० हजार मेट्रिक टनांहून अधिक स्टीलचा वापर करण्यात आला आहे. यामुळे देशातील स्टील उद्योगाला मोठे बळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. या पुलाची लांबी ७० मीटर, रुंदी १४ मीटर असून, उंची १३ मीटर इतकी आहे. कोलकात्यातील दुर्गापूर येथील कार्यशाळेत हा ६७४ मेट्रिक टन वजनाचा पूल तयार करण्यात आला आहे. पूल ट्रेलरच्या सहाय्याने साइटवर आणून, ४९ मीटर लांबीच्या लॉन्चिंग नोजच्या मदतीने (ज्याचे वजन २०४ मेट्रिक टन आहे) तो यशस्वीरीत्या ट्रॅकवर बसवण्यात आला.
१२ तासांत यशस्वीरीत्या उभारणी
पूल उभारणीसाठी सुमारे २८ हजार ८०० उच्च ताकदीचे टॉर-शियर टीटीएचएस बोल्ट्स वापरण्यात आले. सी ५ ग्रेड पेंटिंग, इलास्टोमेरिक बेअरिंग्ज यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा पूल तयार करण्यात आला असून, त्याचे आयुष्य १०० वर्षांपर्यंत आहे. हा स्टील पूल १८ मीटर उंच तात्पुरत्या ट्रेसल्सवर उभा करून जमिनीपासून असेंबल करण्यात आला. डीएफसीसीच्या ट्रॅकवर मर्यादित वेळेत ब्लॉक घेत केवळ १२ तासांत हा पूल यशस्वीरीत्या बसवण्यात आला. बुलेट ट्रेनच्या गतीनेच या प्रकल्पाची कामेही झपाट्याने पुढे जात असून, ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तयार होणाऱ्या या प्रगत तंत्रज्ञानाच्या पुलांनी देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्राला बळकटी मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.