जपानी ‘शिंकनसेन’ बुलेट ट्रेन लवकरच भारतात; २०२६ मध्ये चाचणी !

जपानी ‘शिंकनसेन’ बुलेट ट्रेन लवकरच भारतात; २०२६ मध्ये चाचणी !
Published on

जपानी ‘शिंकनसेन’ लवकरच भारतात
२०२६मध्ये चाचणी; बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळाली असून, या मार्गावर चाचणीसाठी जपानमधून दोन अत्याधुनिक बुलेट ट्रेन लवकरच भारतात दाखल होणार आहेत. ‘ई-५’ आणि ‘ई-३’ श्रेणीतील या शिंकनसेन बुलेट ट्रेन २०२६च्या सुरुवातीला भारतात येणार असून, त्यांचा वापर प्रामुख्याने प्रशिक्षण आणि तांत्रिक चाचण्यांसाठी केला जाणार आहे.
बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबई आणि अहमदाबाद हे दोन महत्त्वाची आर्थिक केंद्रे जोडली जाणार आहेत. एकूण ५०५ किलोमीटरच्या या मार्गावर अनेक टप्प्यांमध्ये कामे सुरू असून, सुरत ते बिलीमोरा या ४८ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील काम १ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करून चाचण्या घेण्यात येणार आहेत. ‘ई-३’ श्रेणीतील शिंकनसेन ट्रेनची ताशी २७५ किलोमीटर, तर ‘ई-५’ श्रेणीतील ट्रेनची ताशी ३२० किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता ठेवतात. याव्यतिरिक्त, ‘ई-१०’ नावाची अधिक आधुनिक शिंकनसेन ट्रेन २०३०मध्ये देशात दाखल होणार असून, तिचा वापर पूर्ण मार्गावर होणार आहे. या नव्या गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी अधिक आरामदायी आसनव्यवस्था, ध्वनी नियंत्रण आणि ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
...
विविध कामे प्रगतिपथावर
- मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि शिळफाटादरम्यान २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील सात बोगद्यांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे.
- गुजरातमधील बुलेट ट्रेन मार्गावर ध्वनी अडथळे (साउंड बॅरिअर्स) बसवण्याचे कामही अंतिम टप्प्यात असून, सुमारे १५० किलोमीटर लांबीच्या मार्गावर तीन लाखांहून अधिक ध्वनिरोधक बसवण्यात आले आहेत.
- १३५ किलोमीटर मार्गावर रेल्वे रूळ टाकण्याचे कामही सुरू झाले असून, ओव्हरहेड साहित्य उभारणीलादेखील वेग आला आहे. सुरत-बिलीमोरा या पहिल्या टप्प्यावर बुलेट ट्रेन धावणार असल्याने त्यासाठी लागणाऱ्या सर्व तांत्रिक यंत्रणांची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com