

रिलायन्स टेक्स्टाइल पार्कविरोधात निदर्शने
पालघर, ता. १ (बातमीदार) : जिल्ह्यातील केळवे, माहीम, कमारे आणि टोकराळे येथील ग्रामस्थांनी प्रस्तावित रिलायन्स टेक्स्टाइल पार्कविरोधात रविवारी (ता. १) जोरदार निदर्शने केली. आमचे प्राण गेले तरी जमीन देणार नाही, अशी शपथ घेऊन ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली.
केळवे, माहीम, टोकराळे आणि कमारे परिसरातील गावे मिळून पर्यावरण दक्षता संयुक्त समितीच्या वतीने नियोजित टेक्स्टाइल पार्कसाठी शासनाने जमीन दिलेल्या ठिकाणी जाऊन ग्रामस्थांनी विरोध दर्शवला. भूमिहीन लोकांना तिचे वाटप करण्याचे शासनाने ठरवले होते; मात्र सरकार बदलल्यानंतर हे बारगळले. त्यामुळे हा प्रदूषणकारी प्रकल्प रद्द करून ही जमीन भूमिहीनांमध्ये वाटप करण्याची मागणी दक्षता संयुक्त समितीचे अध्यक्ष हिरेन पाटील यांनी केली. या वेळी केळवेचे सरपंच संदीप किणी, माहीमच्या सरपंच प्रीती पाटील, कमारेच्या सरपंच वैशाली पडवळे, उपसरपंच संदीप चव्हाण व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
फोटो ः प्रस्तावित रिलायन्सच्या टेक्स्टाईल पार्क जागेवर जाऊन निदर्शने करताना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.