Thane Water Supply cut

Thane Water Supply cut

ESakal

Thane Water Supply: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात २४ तास पाणीपुरवठा बंद, कधी? जाणून घ्या

Water Supply Cut: ठाणे शहरातील काही भागात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Published on

ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह इतर जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात चांगली वाढ झाली आहे. मात्र अशातच ठाणेकरांना पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे. ठाणे शहरातील काही भागात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय येथे बारवी गुरुत्व वाहिनी क्र. १, २ व ३ वर वाहिन्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. या जलवाहिन्यांचे उन्नतीकरण आणि तातडीने देखभाल करण्यासाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे पालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा, दिवा यांच्यासह वागळे आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समितींचा काही भाग येथे शुक्रवारी (ता. १९) पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Thane Water Supply cut
Mumbai News: जुन्या वाहनांवर ‘मामा’, ‘दादा’ क्रमांक! मुंबईत ६५ चालकांना दंड

बारवी गुरुत्व वाहिनी क्र. १, २ व ३ वर वाहिन्यांचे उन्नतीकरण व तातडीने देखभाल करण्यासाठी गुरुवारी (ता. १८) रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत एकूण २४ तास पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे ठाणे महापालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

तसेच वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरूनगर तसेच मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा २४ तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. दरम्यान, पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. या कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे. तसेच पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने नागरिकांना केले आहे.

Thane Water Supply cut
Doctors Strike: डॉक्टर संघटनेची संपाची हाक, १२ तास खासगी रुग्णालयांसह क्लिनिक बंद; नेमकं कारण काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com