पनवेलमध्ये वन विभागाची नवीन इमारत

पनवेलमध्ये वन विभागाची नवीन इमारत

Published on

कामोठे, ता. २१ (बातमीदार) : पनवेल वन क्षेत्रात अंतिम भूखंड क्रमांक ३५५, फॉरेस्ट कॉलनी, तक्का येथे वन विभागाकरिता प्रशासकीय इमारत व निवासी सदनिका इमारतीचे बांधकामाचा राज्य सरकारकडे प्रस्ताव होता. या कामाकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या तांत्रिक सहमती व उच्चस्तरीय सचिव समितीने दिलेल्या सहमतीनुसार १९.१६ कोटी रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

पनवेलमधील फॉरेस्ट कॉलनी, तक्का येथे वन विभागाकरिता प्रशासकीय इमारत व निवासी सदनिका इमारतीचे बांधकाम करण्यासाठी सुमारे २३ कोटींच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आला होता. त्यापैकी १९.१६ कोटींच्या अंदाजपत्रकाला कोकण सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी तांत्रिक सहमती दिलेली आहे. प्रशासकीय इमारतीत पनवेल वनपरिक्षेत्र अधिकारी, संरक्षण आणि अतिक्रमण निर्मूलन अधिकारी, सहाय्यक वन संरक्षक यांचे कार्यालय आणि निवासी सदनिकेत अधिकारी आणि कर्मचारीवर्गांच्या घरांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com