ठाणे पालिकेच्या महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर

ठाणे पालिकेच्या महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर

Published on

ठाणे पालिकेच्या महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर
- उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : ठाणे महापालिकेच्या महापौरपदावर भाजपने दावा करीत, महापौरपद न दिल्यास विरोधी बाकावर बसण्याची तयारी दर्शविली होती. अखेर भाजपने आपली भूमिका बदलत सत्तेत राहणे पसंत केले. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या महापौरपदी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांनी अर्ज दाखल केला, तर भाजपकडून कृष्णा पाटील यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. युतीच्या विरोधात कोणीही अर्ज दाखल केला नसल्याने महापौर आणि उपमहापौर या दोघांचीही बिनविरोध निवड निश्चित आहे, मात्र अधिकृत घोषणा येत्या ३ फेब्रुवारीला होणार आहे.

महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे ७५ नगरसेवक विजयी झाल्याने पालिकेवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले, तर भाजपचे २८ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे महापौरपदी शिवसेनाचा महापौर बसणार, हे निश्चित झाले होते. मात्र, भाजपनेदेखील महापौरपदावर आपला दावा केला होता. त्यातच महापौरपदासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण पडल्याने महापौरपदासाठी डॉ. दर्शना जानकर, विमल भोईर, पद्मा भगत आणि शर्मिला पिंपोळलकर यांच्या नावाची चर्चा होती, तर भाजपने दोन उमेदवारांची नावे जाहीर केली होती.

जे काही होईल, ते चांगलेच होणार
शुक्रवारी महापौरपदासाठी शर्मिला पिंपोळकर, तर उपमहापौरपदासाठी भाजपच्या कृष्णा पाटील यांनी अर्ज दाखल केले. शर्मिला पिंपोळकर या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी पाचपाखाडी परिसरातून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. आम्ही युतीत लढलो होतो. त्यानुसार आता सत्तेतही आम्ही एकत्र आहोत. इतर पदांबाबत महापौर प्रत्यक्ष खुर्चीवर विराजमान झाल्यावरच कोणाला काय द्यायचे, यावर चर्चा होणार आहे. परंतु जे काही होईल ते निश्चित चांगलेच होणार असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.
-------------------
एका सर्वसामान्य स्त्रीला न्याय दिला आहे. त्यामुळे मला जे पद मिळाले आहे, त्या पदाला न्याय देण्याचे काम निश्चितपणे करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच दिलेल्या संधीचे सोने केले जाईल.
- शर्मिला पिंपोळलकर - गायकवाड, महापौरपदाच्या उमेदवार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com