जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनाला प्रतिसाद
जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनाला प्रतिसाद
वाणगाव(बातमीदार): पद्मश्री जिव्या सोमा मशे औद्योगिक प्रशिक्षण संस्था वानगाव संस्थेमध्ये जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनात जिल्ह्यातील १६ शासकीय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी सहभाग घेतला होता.
तंत्र प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अनिल सदाफुले यांनी केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य संजय भोई होते. निवड समिती सदस्य श्रीराम जोशी वसईचे मालक यांनी इंडस्ट्रीज ४.० आयओटी, एआयसारख्या संकल्पना समोर असून तयार केलेले प्रकल्प त्याला सुसंगत असणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी प्रदर्शनात २५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर ५५ प्रकल्प सादर करण्यात आले. यातील निवडलेल्या विविध प्रकल्पांना विभागीय स्तरावर पाठवण्यात येणार आहे.
.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

